बिजनोर जिल्हा कोषागार विभाग गेल्या 50 वर्षांपासून माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी ठेवलेली 73 किलो चांदी ठेव म्हणून ठेवलेली अमानत सांभाळून ठेवण्यात आली आहे. गेल्या 50 वर्षापासून ही चांदी कोषागारमध्ये ठेवण्यात आली असली तरी आजपर्यंत ही चांदी परत घेण्यासाठी इंदिरा गांधी कुटुंबीयांच्यावतीने कोणताही दावा करण्यात आलेला नाही.
आजच्या दरानुसार चांदीची किंमत सुमारे 33 ते 34 लाख रुपये आहे. कोषागार अधिकाऱ्यांमार्फत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या या मालकीच्या चांदीला भारतीय रिझर्व्ह बँकेकडे सोपवण्यासाठी पत्रव्यवहारही करण्यात आला, त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने कोषागार विभागाला ही चांदी ताब्यात घेण्यास देत स्पष्टीकरण देण्यात आले की, ही संपत्ती त्यांच्या मालकीची आहे, त्यामुळे आम्ही ती घेऊ शकत नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आले.
त्यानंतर राज्य सरकारलाही याबाबत कल्पना देऊन त्यांचे मत मागविण्यात आले मात्र राज्य सरकारकडूनही कोणतेही त्यानंतर स्पष्टीकरणे देण्यात आले नाही. त्यामुळे आजही इंदिरी गांधी यांच्या मालकीचे 73 किलो चांदी बिजनोर कोषागारकडेच ठेवण्यात आले आहे.
आशिया खंडातील सगळयात मोठा मातीचा बांध बिजनोरमधील कालागडमध्ये बांधण्यात येणार होता. या मातीच्या बांधकामाचे काम सुरु असताना, पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे आभार मानण्यासाठी म्हणून बिजनोरमधील नागरिकांनी 1972 मध्ये त्यांना आमंत्रित केले होते. त्यावेळी त्या सभेत कालागडमध्ये मातीचा बांध बांधणारे मजूर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी इंदिरा गांधी यांची तुलाभार करण्यात आली होती, इंदिरा गांधींची तुलाभार करताना एका तराजूत चांदी टाकण्यात आली होती, तर एका बाजूला इंदिरा गांधी होत्या. त्यावेळी त्यांचे वजन 72 किलोच्या आसपास होते. त्या चांदीबरोबरच इतर वस्तुंचाही समावेश त्यामध्ये होता.
बिजनोरमध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलाभार झाल्यानंतर त्यांनी ती चांदी आपल्याबरोबर घेऊन गेल्या नाहीत. तर त्यावेळच्या तत्कालिन प्रशासनाने ती सगळी चांदी बिजनोर जिल्ह्यातील कोषागारमध्ये ठेवली. तेव्हापासून ते आजपर्यंत इंदिरा गांधी यांची ही अमानत कोषागार विभागाने जपून ठेवली आहे. त्यानंतर कोषागार विभागातील अधिकाऱ्यांनी ती चांदी पुन्हा ताब्यात देण्यासाठी पत्रव्यवहार केले मात्र प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.