श्रीलंकेच्या नौदलाने १५ भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे. श्रीलंकेच्या सागरी हद्दीचे उल्लंघन करून या भागात मच्छीमारी केल्याबद्दल या मच्छीमारांच्या दोन स्वयंचलित नौका ताब्यात घेऊन श्रीलंकेच्या नौदलाने या १५ जणांना अटक केल्याची माहिती रविवारी नौदलाकडून निवेदनाद्वारे देण्यात आली.
मन्नार बेटाच्या वायव्य किनारपट्टीवर असलेल्या तलाईमन्नार येथे शनिवारी मच्छीमारांना अटक करण्यात आली. तलाईमन्नार येथे नौदल कोठडीत ठेवलेल्या या मच्छीमारांना मत्स्यपालन निरीक्षकांच्या ताब्यात देण्यात येईल.