राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे सध्या राज्यातील धरणांमध्ये 47.72 टक्के पाणीसाठा असल्याने आहे. त्यामुळे मे महिन्याच्या उकाड्यातही यंदा बहुतांश भागातील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.
नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि कोकण विभागातील लघू, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण धरणांमध्ये सरासरी 50 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या राज्यातील धरणांमध्ये 7 टक्के जास्त पाणीसाठा आहे. ही राज्यातील जनतेसाठी आनंदाची बाब आहे.
मे महिना उजाडला की राज्यातील बरीच धरणं तळाला लागलेली असतात आणि या भागात पाणीटंचाईचं संकट उभं राहतं. पण, यंदा चित्र सकारात्मक आहे. धरणं निम्मे भरलेली आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची आता माहाराष्ट्राच्या जनतेला चिंता नाही.
राज्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये मिळून सध्या 47.72 टक्के पाणीसाठा आहे. काही धरणं निम्म्यापेक्षा जास्त भरले आहे. त्यामुळे राज्यातील धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदा मे महिन्याच्या उकाड्यातंही राज्याची पाण्याची चिंता मिटली आहे.