पंतप्रधानांची जादू आजही कायम तर गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस निष्प्रभ
सत्तेची आठ वर्षे हा जनतेचा मूड बदलण्यासाठी मोठा कालावधी आहे. 2012 च्या सुमारास सरकारमधील भ्रष्टाचाराचे घोटाळे पूर्ण ताकदीनिशी समोर आले तेव्हा माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना याची जाणीव झाली. त्यावेळी संयुक्त पुरोगामी आघाडीनं मागील आठ वर्षांत मिळवलेल्या दोन दमदार विजयाचा लोकांना विसर पडला होता. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राजकीय कौशल्याच्या जोरावर हे आव्हान परतावून लावलं आहे. पंतप्रधानपदाची आठ वर्षे पूर्ण करूनही 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोदींचं स्थान भक्कम असून ते इतरांपेक्षा आघाडीवर आहेत. मतदारांचा एक भला मोठा गट आजही त्यांच्या बाजूने असल्याचं उत्तर प्रदेश आणि बिहार या मोठ्या राज्यांमधील निवडणुकीत मिळालेल्या विजयातून स्पष्ट झालं.
भाजपविरोधाच्या तिसऱ्या आघाडीत शरद पवार नाहीत? देशातल्या राजकीय घडामोडींना वेग
केंद्रात भाजपला शह देण्यासाठी देशभरातील विविध राज्यातील विरोधक एकवटण्याच्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे या तिसऱ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच घडामोडी देखील घडत आहेत. पण या तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व नेमकं कोण करेल? हा मुद्दा आता जास्त महत्त्वाचा आणि गडद होताना दिसत आहे. कारण तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केंद्रात विरोधकांच्या तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व करायचं आहे. ती भावना त्यांनी मुंबईत शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परषदेत बोलून दाखवली होती. दुसरीकडे शरद पवारांनी तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व करावं, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच व्यक्त केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे भाजप विरोधात विरोधकांची जी एकजूट होईल त्याचं नेतृत्व पवारांनी करावं, असं महाराष्ट्रातील काही नेत्यांचं मत आहे. अर्थात शरद पवार हे काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडीसोबत जाणार नाहीत, असं त्यांनी याआधीच व्यक्त केलं आहे. तर तिसरीकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या सुरु असलेल्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी काहीतरी वेगळंच राजकीय समीकरण उभं करण्याचं खुणावत आहे. त्यामुळे आगामी काळात देशाच्या राजकारणात नेमक्या काय-काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
देशातील सर्वात मोठी बातमी; जम्मूमध्ये चिनी नागरिकाच्या नावे भारतीय आधारकार्ड, महाराष्ट्रातून केलं इश्यू
जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. येथे एका चिनी नागरिकाला अवैधपणे फिरताना पकडण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चिनी नागरिकाकडे भारतीय आधारकार्ड सापडलं आहे. जम्मू-काश्मीरमधील गंडेरबाल जिल्ह्यातून हा प्रकार समोर आला आहे. या चिनी नागरिकाचं नाव यांग झूहोंग असून तो 47 वर्षांचा आहे. तो लेहहून श्रीनगरच्या दिशेने जात होता. यावेळी गंडेरबाल या भागात त्याला पकडण्यात आलं. पोलिसांना त्याच्याजवळ भारतीय आधारकार्ड सापडलं आहे. त्याच्या आधारकार्डाचा क्रमांक 364257589471 आहे. याशिवाय महाराष्ट्रातून त्याला हे आधारकार्ड इश्यू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांसाठी खूशखबर लवकरच 50 हजारांचे अनुदान खात्यात जमा होणार, राज्य सरकारच्या जोरदार हलचाली
राज्यातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंतचे अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली. दरम्यान पात्र शेतकऱ्यांची यादी ११ मे पर्यंत देण्याचे सहकार विभागाकडे देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. या योजनेची स्पष्टता आल्यानंतर संगणकीय प्रणाली पूर्ण होऊन पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान या सर्व बाबी लवकरच पूर्ण होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर पैसे जमा होणार आहेत. नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी बँकांनी पाठवली असल्याने पुढच्या दोन आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळण्याची शक्यता आहे.
हाताला काळ्या फिती, डोळ्यांमध्ये संताप, शिवसैनिक अनिल परबांच्या घराबाहेर, पोलीसही सतर्क
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अशी ख्याती असलेले राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या पाठीमागे आज ईडीचा ससेमिरा लागला आहे. ईडीने आज त्यांचं वांद्रे येथील निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. ईडीने आज सकाळी धाड टाकली तेव्हा अनिल परब आपल्या वांद्रे येथील निवासस्थानी नव्हते. पण या धाडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची तयारी सुरु झाली असताना शिवसेनेच्या एका बड्या नेत्याच्या घरावर अशाप्रकारे ईडीने धाड टाकल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. विशेष म्हणजे ईडीची कारवाई सुरु असताना वांद्र्यातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. अनिल परब यांच्या वांद्र्याच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या घडामोडी आता नेमक्या कुठे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, संभाजीराजेंची भूमिका काय? लवकरच निर्णय करणार जाहीर
राज्यसभेच्या दोन जागांवर आज शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेच्या ऑफरला प्रतिसाद न दिल्याने अखेर शिवसेनेने कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना सहाव्या जागेवर उमेदवारी दिली. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संजय राऊत आणि संजय पवार यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सहाव्या जागेवर संजय पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर आता संभाजीराजे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कारागृह अधीक्षकांच्या मुलाचा घेतला जीव
हडपसर मध्ये पती, पत्नी और वो या सिनेमा सारख्याच कथानकातून साक्षी पांचाळ नावाच्या तरुणीने पोलीस अधीक्षकांच्या मुलाची हत्या केली आहे. आरोपी साक्षी हिने आपला पती आणि भावाच्या मदतीने अमरावतीला कारागृह पोलीस अधीक्षक असलेल्या गायकवाड यांच्या मुलाची हडपसरच्या ग्लायडिंग सेंटर येथे चाकूने वार करून हत्या केली.
पुण्यातील हडपसर येथे पती पत्नी और वो सिनेमातल्या कथानकाप्रमाने खुनाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर कथानकातल्या मुलीने म्हणजे साक्षी पांचाळ आणि तिच्या पतीने भावाच्या मदतीने घडवून आणला आहे. हडपसर पोलिसांनी साक्षी पांचाळ हिच्यासह तिचा पती आणि भाऊ यांच्यासह इतर तीन जणांना अटक केली आहे.
‘कुत्र्याने दर्शन घेतल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या’; संतापलेल्या ब्लॉगरने मोदींनाच लिहिलं पत्र
नोएडाचा ब्लॉगर केदारनाथमध्ये आपल्या पाळीव कुत्र्यासह फिरायला आला होता. या हस्की जातीच्या कुत्र्याचं नाव नवाब त्यागी आहे. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. आता ब्लॉगरने पीएम मोदी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
ब्लॉगर दाम्पत्याची वकील नेहा रस्तोगीने आपल्या पत्रात लिहिलं आहे की, मंदिरात प्राण्यांना घेऊन जाण्याबाबत कोणतीही नियमावली केदारनाथ-बद्रीनाथ मंदिर प्रशासनाकडून जारी करण्यात आलेली नाही. त्यामुळे ब्लॉगर दाम्पत्यावर कारवाई करणं म्हणजे त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन आहे.
प्रत्येक 100 रस्ते अपघातात 36 लोकांचा मृत्यू, मृतांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक
2020 मध्ये प्रत्येक 100 रस्ते अपघातात कमीत-कमी 36 लोकांचा मृत्यू झाला. हा आकडा मागील 20 वर्षातील सर्वाधिक आकडा आहे. बुधवारी रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक अहवाल जारी करुन ही आकडेवारी सांगितली.
सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचा झाल्याचंही रस्त्यावरील मृत्यूंच्या आकडेवारीवरुन समोर आलं आहे. एकूण 43.5 टक्के लोकांचा दुचाकी चालवताना मृत्यू झाला. तसंच ट्रॅफिक सिग्नल तोडल्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत 79 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2020 मध्ये रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
शेतकऱ्याने पिकवलेल्या आंब्याला चक्क 2 ते 3 लाख रुपये किलो दर
ओडिशाच्या बारगढ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने जगातील सर्वात महागड्या आंब्यांमध्ये गणल्या जाणार्या आंब्याच्या प्रजातीचे झाड मोठे केले आहे. दरम्यान या आंब्याला बाजारात लाखो रुपये किलो असा दर असतो. ओडिशातील बारगढ जिल्ह्यातील निलाथर गावातील शेतकरी चंदू सत्य नारायण यांनी हा आंबा पिकवण्यात यश मिळवले आहे. मियाझाकी या जातीचा महागडा आंबा सेंद्रिय पद्धतीने पिकवण्यात सत्य नारायण यांना यश आले आहे.सर्वसाधारण बाजारात आंब्याची किंमत अडीच ते तीन लाख रुपये किलोने विकला जातो. दरम्यान सत्य नारायण यांनी सरकारकडे हा आंबा खपवण्याची मागणी केली आहे. ओडिशाच्या एका खेडेगावात जन्मलेल्या सत्य नारायण यांचे प्राथमिक शिक्षण ही पूर्ण झाले नाही. ते सध्या 50 वर्षांचे आहेत. त्यानी हा आंबा बांगलादेशातून आणल्याचे सांगितले.
बँकेत आणि पोस्टात पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी आजपासून पॅन, आधार बंधनकारक
भारतातील कॅश विड्रॉवल आणि डिपॉझिट करण्याच्या प्रणालीमध्ये आजपासून म्हणजेच 26 मे 2022 पासून बदल होणार आहेत. एका आर्थिक वर्षात सहकारी बँका आणि पोस्ट ऑफिससह इतर बँक खात्यांमधून 20 लाखांपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी पॅन किंवा आधार क्रमांक नमूद करणं सरकारनं अनिवार्य केलं आहे. हे नियम करंट अकाउंट उघडतानादेखील लागू होतील, असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने या महिन्याच्या सुरुवातीला एका परिपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे.
खूशखबर! Kia EV6 इलेक्ट्रिक कारचं भारतात Booking सुरू; फक्त 3 लाखात बुक
सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे इंधनाची बचत तर होतेच, शिवाय प्रदूषणदेखील कमी होतं. इलेक्ट्रिक बाइक आणि इलेक्ट्रिक कार्सदेखील बाजारात येत आहेत. यामुळे मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेत किया ही कंपनीदेखील मागे नाही. कियाने इलेक्ट्रिक वाहनांच्या मार्केटमध्ये उतरण्याची घोषणा केली आहे. लकवरच किया आपली बहुप्रतिक्षित Kia EV6 ही इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीची ही पहिलीच इलेक्ट्रिक कार असेल. कियाने EV6 साठी भारतात 3 लाख रुपयांमध्ये बुकिंग सुरू केलं आहे. किया भारतात मर्यादित बॅचमध्ये EV6 आयात करणार असून, सुरुवातीला केवळ 100 युनिट्स उपलब्ध होणार आहेत. देशातल्या केवळ 12 शहरांमधल्या 15 निवडक डीलर्सद्वारे ही गाडी बुक करता येणार आहे. किया इंडिया जूनच्या पहिल्या आठवड्यात EV6 सादर करणार आहे. या कारच्या बेस व्हॅरिएंटची किंमत भारतात 30 लाख रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे, तर टॉप मॉडेलची किंमत 45 लाखांपर्यंत जाऊ शकते. याबद्दलचं सविस्तर वृत्त ‘झी न्यूज’ने प्रसिद्ध केलं आहे.
SD Social Media
9850 60 3590