पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे वरिष्ठ नेते शेख रशीद अहमद यांनी रविवारी स्पष्ट केले, की इम्रान यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध काढलेला मोर्चा तात्पुरता स्थगित केला आहे. मात्र, तो कायमचा थांबवण्यात आलेला नाही. दरम्यान, पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी इम्रान खान यांचा पक्ष आणि सरकारमध्ये काही प्रमुख मुद्दय़ांवर सहमती घडवण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे.