अमेरिकेतील पेंसिल्व्हेनियामधील फिलाडेल्फिया येथे अंदाधुंद गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबारात १० लोक जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री झालेल्या या गोळीबारानंतर घटनास्थळी लोकांची धावपळ सुरु झाली होती. जखमींना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांनी जखमींची माहिती जाहीर केलेली नाही. मात्र पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० लोक जखमी झाले आहेत. रॉयटर्सने पोलिसांकडे प्रतिक्रिया मागितली असती त्यांनी अद्याप दिलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेरलं आहे. पोलीस सध्या हल्लेखोराचा शोध घेत आहेत.