“कलम ३७० रद्द करणे योग्यच”, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
“तत्कालीन युद्धजन्य स्थितीमुळे जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्यात आले. ही तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्था आहे. कागदपत्रांमध्येही त्यासंदर्भातला उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे कलम ३७० रद्द करणं योग्यच होतं”, असं आज सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं. जम्मू काश्मीरमध्ये कल ३७० रद्द केल्याने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात सुनावणी झाली होती. त्यावेळी या निर्णयाचा निकाल राखून ठेवला होता. हा निकाल आज ११ डिसेंबर रोजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी वाचून दाखवला. हा निकाल आल्यानंतर भाजपा आणि केंद्रातील अनेक मंत्र्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत जम्मू काश्मीरमधील जनतेला आश्वासित केलं आहे.
आमदार मोहन यादव बनणार मध्य प्रदेशाचे नवे मुख्यमंत्री, भाजपाकडून मोठी घोषणा
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मोठं यश मिळवलं आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या या निवडणुकीत भाजपाने १६३ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. ३ डिसेंबर रोजी निकाल लागल्यानंतर मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भाजपाचे केंद्रीय नेते मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कुणाकडे देणार? याबाबत विविध तर्क वितर्क लावले जात होते.अखेर सोमवारी भाजपाने मुख्यमंत्री पदाबाबत मोठी घोषणा केली. उज्जैन दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन यादव हे मध्य प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री असतील. आमदार यादव हे चार वेळा मुख्यमंत्रीपद भुषवलेल्या शिवराज सिंह चौहान यांची जागा घेतील.
धीरज साहूंकडे इतके पैसे कुठून आले? अखेर काँग्रेसने दिलं उत्तर
झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांचं निवासस्थान आणि कंपनीच्या कार्यालयांसह दहा ठिकाणांवर प्राप्तीकर विभागाने छापा मारला होता. या छापेमारीत ३५४ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. धीरज साहू यांच्या घरात आणि कंपनीच्या कार्यालयामधील कपाटांमध्ये कोट्यवधी रुपये ठासून भरले होते. प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना या नोटा मोजण्यासाठी तब्बल पाच दिवस लागले. या कारवाईवरून भारतीय जनता पार्टीने काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्वच भाजपा नेते साहू यांच्यासह काँग्रेस पक्षावर टीका करत आहेत. साहू यांच्याकडे इतके पैसे कुठून आले असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. यावर अखेर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे.धीरज साहू यांच्यावर कारवाई होत असताना त्यांचा पक्ष म्हणजेच काँग्रेसने त्यांचा कुठल्याही प्रकारे बचाव केला नाही. उलट काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणापासून स्वतःला वेगळं ठेवलं आहे. काँग्रेसचे सचिव आणि खासदार जयराम रमेश यांनी काँग्रेसकडून सर्वप्रथम यावर भाष्य केलं. जयराम रमेश यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, खासदार धीरज साहू यांच्या व्यवसायाशी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही. या संपत्तीबाबत फक्त साहूच सांगू शकतात. तसेच प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या घर-कार्यालयात सापडलेल्या रोख रकमेबाबत केवळ साहू यांनीच स्पष्ट करावं.
“जम्मू काश्मीरमध्ये सप्टेंबर २०२४ पर्यंत विधानसभा निवडणुका घ्या”, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
कलम ३७० रद्द केल्यावरून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. या आव्हान याचिकेवर आज सुनावणी पार पडली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तीन निकाल दिले आहेत. यापैकी एक निकाल म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी या निकालाचे वाचन केले. त्यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या घटनात्मक वैधतेचे समर्थन केले आहे.जम्मू आणि काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा बहाल करण्यात यावा असे आदेश केंद्र सरकारला आणि ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या निवडणुका घेण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले आहेत.
तुळजाभवानीचा गायब झालेला सोन्याचा मुकूट सापडला
तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानीचा गायब झालेला सोन्याचा मुकूट सापडला असल्याचा दावा सोने मोजनी समिती सदस्य आणि पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केलाय. तुळजाभवानी मंदिरातील पितळी पेटीत हा मुकूट सापल्याची माहीती मिळली आहे. ८२६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट गायब झाला असल्याचे मोजनी समितीच्या अहवालात सांगण्यात आले होते. मात्र, तोच मुकूट अता सापडल्याचा दावा कदम यांच्याकडून करण्यात आलाय.
अजितदादांना मुख्यमंत्री करा, माझ्या पक्षाच्या पाठिंब्याची हमी मी देतो : भास्कर जाधव
अजित पवार यांना मुख्यमंत्री करा. माझ्या पक्षाच्या पाठिंब्याची हमी मी देतो, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानसभेत केले. अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल मी आत्ता ठराव मांडतो, मला तुमच्यातला दम मला बघायचा आहे, असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले.
राज्यात ६६१ खासगी शाळा अनधिकृत; गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
‘खासगी व्यवस्थापनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या ६६१ शाळा अनधिकृत सुरू असल्याचे निदर्शनास आले. या शाळा बंद करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा देखल करून दंड आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यापैकी ७८ शाळा बंद करून त्यातील ६ हजार ३०८ विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात आले आहे’, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली.
त्याच्या १ टक्का तरी खेळला तरी…; रिंकूची युवराजसोबत तुलना, गावस्करांचा स्ट्रेट ड्राईव्ह
आयपीएलमुळे रिंकू सिंहचं नाव घरोघरी पोहोचलं. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना रिंकूनं छाप पाडली. त्याची भारतीय संघात निवड झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्यानं आपल्या खेळाची चुणूक दाखवली. आता रिंकूच्या खेळाचं माजी क्रिकेटपटू सुनील गावस्करांनी तोंडभरुन कौतुक होत आहे.आयपीएल २०२३ मध्ये कोलकात्याकडून खेळणाऱ्या रिंकू सिंहनं गुजरात टायटन्सच्या यश दयालच्या शेवटच्या षटकांत ५ चेंडूंवर ५ षटकार ठोकत सर्वांना आपली दखल घ्यायला हवी. या षटकारांमुळे रिंकू सर्वप्रथम चर्चेत आला. यानंतर त्यानं देशांतर्गत स्पर्धांमध्येही दखलपात्र कामगिरी केली. फिनिशर म्हणून त्याचा खेळ बहरत चालला आहे. गावस्करांनी रिंकूच्या खेळामागील महत्त्वाची ताकद त्याचा आत्मविश्वास असल्याचं सांगितलं.
भारतात आता पिंक बॉल टेस्ट सामने होणार नाहीत? BCCI ने घेतला मोठा निर्णय
पिंक बॉल किंवा दिवस-रात्र कसोटी सामन्यांबाबत भारतीय क्रिकेट बोर्डाचा भ्रमनिरास झाल्याचे दिसून येत आहे. यावेळी, भारताच्या देशांतर्गत हंगामात पुरुष किंवा महिला क्रिकेट संघ एकही पिंक बॉल कसोटी सामना खेळणार नाही. येथे महिला प्रीमियर लीग-२ च्या लिलावाच्या वेळी पत्रकारांशी बोलताना बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की बीसीसीआय सध्या गुलाबी चेंडूच्या कसोटीच्या बाजूने नाही कारण सामने चार-पाच दिवसांऐवजी दोन-तीन दिवसांमध्ये संपत आहेत.पिंक बॉल किंवा दिवस-रात्र कसोटी सामन्यांबाबत भारतीय क्रिकेट बोर्डाचा भ्रमनिरास झाल्याचे दिसून येत आहे. यावेळी, भारताच्या देशांतर्गत हंगामात पुरुष किंवा महिला क्रिकेट संघ एकही पिंक बॉल कसोटी सामना खेळणार नाही. येथे महिला प्रीमियर लीग-२ च्या लिलावाच्या वेळी पत्रकारांशी बोलताना बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की बीसीसीआय सध्या गुलाबी चेंडूच्या कसोटीच्या बाजूने नाही कारण सामने चार-पाच दिवसांऐवजी दोन-तीन दिवसांमध्ये संपत आहेत.
सोलापुरात कांद्याची उच्चांकी आवक; दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
कांद्यासाठी प्रसिध्द असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये अलिकडे कांद्याची वाढती आवक आणि दर घसरणीसह लिलाव रद्द होण्याचे प्रकार घडत असताना सोमवारी उच्चांकी म्हणजे एक लाख ३० हजार क्विंटलपेक्षा जास्त कांदा दाखल झाला. त्यामुळे प्रतिक्विंटल सुमारे दीड ते दोन हजार रूपयांपर्यंत दर कोसळल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड होऊन त्यांच्या डोळ्यात पाणी आले.
“२४ डिसेंबरपर्यंत थांबा, माझा बोलविता धनी कळेल”, प्रसाद लाड यांच्या विधानावर जरांगेंचं प्रत्युत्तर
सध्या मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करायला सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस तुमच्या मनात काही विषारी विचार असेल तर मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका. त्यांच्या माध्यमातून मराठ्यांमध्ये कलह लावू नका, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. यानंतर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी जरांगेंवर टीकास्र सोडलं आहे.तुम्ही लेकरू लेकरू म्हणत राजकीय ‘ढेकरू’ द्यायला लागला आहात. देवेंद्र फडणवीसांविरोधात बिलकूल भाष्य करू नका, असं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. तुमचा राजकीय बोलविता धनी कोण आहे? हेही आम्हाला माहीत आहे, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली. लाड यांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.मला कोणावरही बोलायचं नाही. २४ डिसेंबरपर्यंत थांबा, आमचा बोलविता धनी कोण आहे? हे तुम्हाला कळेल. थोडा दम धरा… अशा शब्दांत मनोज जरांगे पाटलांनी उत्तर दिलं आहे. यानंतर आता भाजपा नेते आणि मनोज जरांगे यांच्यात नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
पुन्हा एकदा रंगणार भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला, अंडर-१९ विश्वचषकाचे वेळपत्रक जाहीर
पुरुषांच्या अंडर-१९ विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही स्पर्धा १९ जानेवारीपासून सुरू होत आहे. अंतिम सामना ११ फेब्रुवारीला होणार आहे. या कालावधीत एकूण ४१ सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ २० जानेवारीपासून येथे आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. सध्या टीम इंडिया दुबईमध्ये १९ वर्षाखालील आशिया चषकात खेळत आहेत. सुपर-६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला पाहायला मिळू शकतो.
आयसीसीने सोमवारी संध्याकाळी अंडर-१९ विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. यावेळी विश्वचषकात चार गट करण्यात आले आहेत. चारही गटात प्रत्येकी चार संघ ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक संघ त्यांच्या गटातील उर्वरित तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. चारही गटांतील अव्वल ३ संघ पुढील फेरीत प्रवेश करतील. म्हणजेच दुसऱ्या फेरीत एकूण १२ संघ असतील. येथे प्रत्येक संघ दुसऱ्या गटातील दोन संघांसह प्रत्येकी एक सामना खेळेल. म्हणजेच या फेरीत प्रत्येक संघाचे दोन सामने होतील. यानंतर सर्वोतम-४ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. सेमीफायनल आणि फायनलसाठीही राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
भारताविरुद्धच्या पाच कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर, तीन अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश
भारत दौऱ्यासाठी इंग्लंडने कसोटी संघ जाहीर केला आहे. १६ सदस्यीय संघाचे नेतृत्व बेन स्टोक्सच्या हाती देण्यात आले आहे. अष्टपैलू ख्रिस वोक्सला स्थान मिळाले नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या निवडकर्त्यांनी तीन अनकॅप्ड खेळाडूंना संधी दिली आहे. वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सनशिवाय टॉम हार्टली आणि शोएब बशीर या दोन फिरकी गोलंदाजांची निवड करण्यात आली.भारत दौऱ्यासाठी इंग्लंडने फिरकी विभागावर अधिक काम केले आहे. चार फिरकीपटूंच्या उपस्थितीमुळे इंग्लंडच्या फिरकी विभागात बरीच विविधता आहे. डावखुरा फिरकीपटू जॅक लीचचा राखीव म्हणून हार्टलीची निवड करण्यात आली आहे. रेहान अहमदचे संघात पुनरागमन झाले आहे. तो उजव्या हाताचा लेग स्पिनर आहे. तर, शोएब बशीर हा उजव्या हाताचा ऑफस्पिन गोलंदाज आहे.
SD Social Media
9850603590