केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरील नियंत्रण हटवल्यानंतर देशातील ऑईल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले जातात. ऑईल कंपन्या रोज सकाळी दरवाढ जाहीर करतात. देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांमुळं ही प्रक्रिया थांबली होती. आता निवडणुका संपल्यानंतर दरवाढीचा शॉक सर्वसामान्यांना बसत आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये तब्बल 12 वेळा इंधनदरवाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत 8 रुपये 40 पैशांनी डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. दुसरीकडे वाढत्या महागाईवरुन विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतलीय. महाराष्ट्रात युवा सेनेकडून थाळी बजाव आंदोलन करण्यात आलं होतं. तर, उबरनं देखील त्यांच्या सेवेत दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई पेट्रोल 118.81 रुपये तर डिझेल 103.04 रुपयांना विकलं जातंय. तर, पुणे शहारत 118.29 रुपयांवर पोहोचलंय. तर डिझेल 101.01 रुपयांवर पोहोचलंय.
देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील शहरांचा भाव
देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 103.81 रुपयांवर पोहोचला आहे. तर, डिझेलचा दर 95.07 रुपयांवर पोहोचलाय.
आर्थिक राजधानी मुंबईतील पेट्रोलचा दर 118.81 रुपये तर डिझेलचा दर 103.04 पैशांवर पोहोचला आहे. आज लीटरमागे 40 पैशांची वाढ झाली आहे.
चेन्नईतील पेट्रोलचा दर 109.36 रुपयांवर डिझेलचा दर 99.44 वर पोहोचला आहे.
कोलकातामधील पेट्रोलचे दर 113.43 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेल 98.22 रुपयांना विकलं जात आहे.
पुण्यात पेट्रोलचे दर देखील वाढले आहेत. पेट्रोलचे दर 118.29 रुपयांवर पोहोचले आहेत. तर पॉवर पेट्रोलचे दर 122.79 रुपयांना विकलं जातंय. डिझेलचे पुण्यातील दर 101.01 वर पोहोचले आहेत. तर,सीएनजी गॅसची किंमत 62.20 रुपयांवर पोहोचले आहेत.