काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तर, यामुळे प्रियंका गांधी यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सेल्फ आयसोलेशनमध्ये रहावं लागणार आहे. प्रियंका गांधी यांनी स्वतः ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. नुकतंच कोरोना संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने मला आपला आसाम दौरा रद्द करावा लागत आहे. माझी कालची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुढील काही दिवस विलगीकरणात राहणार आहे. या असुविधेसाठी मी सर्वांची क्षमा मागते. मी काँग्रेसच्या विजयासाठी प्रार्थना करते.” असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.