बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनला एका गोष्टीची चिंता वाटतेय

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनला एका गोष्टीची चिंता वाटत आहे. तिने आपली ही चिंता सोशल मीडियावरही व्यक्त केली आहे. रवीना सध्या मध्यप्रदेशमध्ये असून कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. दरम्यान, तिने बांधवगड व्याघ्र प्रकल्पात सफारी फेरफटका मारला आहे. तिला वाटणारी चिंता याच दौऱ्या दरम्यानची आहे. तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही चिंता व्यक्त करत काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

रविवारी सोशल मीडियावर रवीना टंडनने रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात मृत्यू पावलेल्या प्राण्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. रवीनाने ‘बजरंग’ नावाच्या वाघाचे फोटो आणि व्हिडिओ सशल मिडियावर शेअर केले आहेत. तिला हा वाघ मध्य प्रदेशच्या बांधवगड टायगर रिझर्व्हमध्ये सफारी दौर्‍यादरम्यान दिसला. व्हिडिओमध्ये बजरंग जंगलाच्या दुसर्‍या भागात जाण्यासाठी रस्ता ओलांडताना दिसत आहे.

रवीना टंडनने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘आणि अच्छे दिन हे असेच असतात! उशीरा सुरुवात झाली. पण आम्ही भाग्यवान आहेत. मगधी गेटमार्गे पार्कमध्ये प्रवेश करत असताना जंगलाच्या दुसऱ्या भागाकडे जाताना रस्ता ओलांडताना बजरंग वाघाला आम्ही पाहिलं. सुदैवाने, हा ट्रक चालक इतका जबाबदार आणि सुसंस्कृत होता की, त्यांनी त्या वाघाला मान दिला आहे आणि ट्रकला थोड्या अंतरावरुन थांबवित आहेत आणि वाघाला रस्ता ओलांडू देत आहेत.

रवीना टंडनने पुढे लिहिलं की, ‘अनेक वन्यजीव इतके भाग्यवान नसतात. रस्ता ओलांडताना अपघातात बरेच सुंदर वन्यजीव आपला जीव गमावतात. राज्य सरकारने जंगलांमधून जाणार्‍या रस्त्यांवरील रहदारी कमी करावी, झाडं तोडणं थांबवावे ही काळाची गरज आहे. असं केल्यानं ते सुरक्षित होतील. रवीना टंडन आपल्या कुटुंबासोबत बांधवगड टायगर रिझर्व येथे गेली होती. तिचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर चाहते रविनाचं या पोस्टनंतर कौतुक करत असल्याचं पहायला मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.