लाईव्ह बुलेटिनमध्येच थांबवून पत्रकाराने मागितला पगार

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांवरुन काढत आहेत, तर अनेकांना काम करुनही पगार मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र, सर्वसामान्यांपर्यंत या बातम्या पोहचवणाऱ्या पत्रकारांचंच दुःख समोर आलंय. एका वृत्तनिवेदकाने लाईव्ह बुलेटिनमध्येच थांबून आपल्या वेदना सांगितल्यात. आम्हीही माणसं आहोत, मात्र आम्हाला इथं काम करुनही पगार मिळत नाही, अशी तक्रार या पत्रकाराने सांगितलीय. या पत्रकाराचं नाव कॅलिमिना काबिंदा असं असून तो झांबियाच्या केबीएन वृत्तवाहिनीत काम करतो. या घटनेनंतर जगभरात या व्हिडीओची चर्चा सुरू आहे

आफ्रिकेतील झांबिया (Zambia) देशातील केबीएन चॅनलमध्ये पत्रकारांकडून काम करुन घेतलं जातंय, मात्र पगार दिला जात नसल्याचा आरोप झालाय. हा आरोप दुसरा तिसरा कुणी नाही तर केबीएनच्या वृत्तनिवेदकाने लाईव्ह टीव्हीवर केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. कॅलिमिना काबिंदा या पत्रकाराने वृत्तवाहिनीवर बातम्या सांगत असतानाच मध्येच थांबून केबीएन चॅनलमध्ये काम करुनही माझ्यासह अनेक सहकाऱ्यांना पगार मिळत नसल्याचा आरोप त्यानं केला. हा प्रकार 19 जून रोजी घडला.

कॅलिमिना काबिंदा म्हणाले, ‘बातम्यांपलिकडे जाऊन आम्हीही माणसं आहोत. आम्हाला आमच्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे. दुर्दैवाने आम्हाला केबीएन टीव्हीकडून पगार दिला जात नाहीये. माझ्या सहकाऱ्यांना देखील वेतन दिलं जात नाहीये. इतकंच नाही तर काबिंदाने यानंतर हा व्हिडीओ आपल्या फेसबूक अकाऊंटवरही शेअर केलाय.

‘पत्रकार स्वतःवरील अन्यायावर बोलण्यास घाबरतात’
काबिंदा यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, “हो मी लाईव्ह टीव्हीवर पगार मिळत नसल्याचं सांगितलं आहे. कारण अनेक पत्रकार यावर बोलण्यास घाबरतात. याचा अर्थ पत्रकारांनी यावर बोलायला नको असा नाही.” दुसरीकडे केबीएन वृत्तवाहिनीचे सीईओ कॅनेडी मांब्वे यांनी चॅनलच्या फेसबुक पेजवर स्पष्टीकरण देत पत्रकार काबिंदा ब्रॉडकास्ट करत असताना नशेत असल्याचा आरोप केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.