लखीमपुर घटनेचा निषेध
करतो : शरद पवार
दिल्लीमध्ये माध्यमांशी शरद पवार यांनी संवाद साधला. ते म्हणाले, “ लखिम्पुर हिंसाचारामध्ये ज्यांचे जीव गेले त्याची जबाबदारी भाजप शासित दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारचीच पूर्णपणे आहे. मी या हिंसाचाराचा निषेध करतो. पण फक्त निषेध करून आम्हाला शांती मिळणार नाही. या प्रकरणाचा तपास,चौकशी केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश मार्फत चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध पानी का पानी झालं पाहिजे. या प्रकारामुळे केंद्र सरकारची नियत काय आहे, हे दिसून येत आहे. आज त्यांच्याकडे हुकूमत आहे म्हणून ते आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, हे सफल होणार नाही.
देशात प्रथमच कोरोना
लस ड्रोनद्वारे पाठवली
देशात प्रथमच कोरोना लस ही ड्रोनद्वारे पाठवण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मणिपूरमधून याची सुरुवात केली. दक्षिण पूर्व आशियात प्रथमच ड्रोनचा व्यावसायिक वापर करण्यात आला. ही लस मणिपूरमधील बिशनपूर इथून करंगला याठिकाणी पाठविण्यात आली. या दोन्ही ठिकाणांचं अंतर रस्त्याच्या माध्यमातून 26 किमी आहे. यासाठी चार तासांचा प्रवास करून लस पोहोचवण्यात येतात. पण ड्रोनच्या माध्यमातून हे अंतर 15 किमी झालं.
लखीमपुर येथे गेलेल्या प्रियांका
गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात
लखीमपूर खेरी इथल्या संघर्षानंतर शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना सीतापूर इथल्या विश्रामगृहात ठेवण्यात आलं होतं. आता त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले असून सीतापूर विश्रामगृहातच तात्पुरतं जेल उभारत बंदिस्त करण्यात आलं आहे. लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. आठजण ठार झाले, अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले
आहेत काय : भाजपची टीका
अंमली पदार्थांच्या तस्करीवरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर नायनाट बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. “मुंबईत क्रुझवर सुरु असलेल्या पार्टीवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्याचं काम राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाच्या विशेष पथकाकडून करण्यात आलं. पण, मुंबईत अशा प्रकारे सर्रास अंमली पदार्थांची तस्करी व वापर होत असताना महाराष्ट्राचं अंमलीपदार्थ विरोधी पथक आणि गृहमंत्री झोपले आहेत काय?”, अशा कठोर शब्दांत अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री यांच्यासह राज्य सरकारला सवाल केला आहे.
फ्रान्सच्या चर्चमध्ये तीन लाख
मुले लैंगिक शोषणाचे बळी
फ्रान्सच्या कॅथोलिक चर्चमध्ये अंदाजे तीन लाख ३० हजार मुले गेल्या ७० वर्षांमध्ये लैंगिक शोषणाला बळी पडली आहेत अशी माहिती मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका प्रमुख फ्रेंच अहवालात आढळून आली आहे. पहिल्यांदाच फ्रान्समध्ये एवढ्या प्रमाणात अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. जे मुलांवर घाणेरडी नजर ठेवतात, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात त्यांना पीडोफाइल म्हणतात. १९५० पासून फ्रान्सच्या कॅथोलिक चर्चमध्ये हजारो पीडोफाइल सक्रिय होते. चर्चमध्ये बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणांच्या तपासात गुंतलेल्या स्वतंत्र आयोगाने ही माहिती दिली आहे.
नेमबाज ऐश्वर्य तोमरने विश्वविक्रम
करत पटकावले सुवर्णपदक
पेरूची राजधानी लिमा येथे सुरू असलेल्या ज्युनियर वर्ल्ड नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतासाठी मंगळवारची सुरुवात सोन्याने झाली आहे. होय, भारतीय नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने ५० मीटर थ्री पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत विश्वविक्रम केला आहे.
शिर्डी येथे रोज पंधरा हजार
भाविकांना दर्शन घेता येणार
राज्य सरकारच्या निर्णयानुसार, येत्या ७ ऑक्टोबरपासून शिर्डीचं साईमंदिर देखील भाविकांसाठी खुलं होणार आहे. मात्र, काही नियम यावेळी लागू असतील. शिर्डी साई संस्थानाच्या नियमावलीनुसार, दररोज १५ हजार भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे. त्याचसोबत, दर्शनासाठी जाताना आता भाविकांना हार-प्रसाद घेऊन जाता येणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
सोशल मिडीयावरील तांत्रिक
बिघाड अखेर सात तासांनी झाला दूर
अलीकडच्या काळात जगण्याची ‘मुलभूत’ गरज बनलेल्या सोशल मिडीया व्यासपीठांवरील तांत्रिक बिघाड अखेर सात तासांनी दूर झाला. सोमवारी रात्री साधारण आठ वाजल्यापासून जगभरात Whatsapp, इन्स्टाग्राम आणि फेसबुक हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस डाऊन झाले. त्यामुळे नेटकऱ्यांना इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर कोणतीही पोस्ट शेअर करता येत नव्हती. तसेच अलीकडच्या काळातील संवादाचे प्रमुख माध्यम असलेल्या Whatsapp वरुन एकमेकांना संदेशही पाठवता येत नव्हते. त्यामुळे नेटकऱ्यांच्या मनात चलबिचल सुरु झाली होती. रात्री उशीरापर्यंत सोशल मीडिया कधी पूर्ववत होणार, याची वाट पाहत होते.
SD social media
9850 60 3590