देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जेमतेम 650 ने वाढ झाली. कालच्या दिवसात 39 हजार 742 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 535 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
गेल्या 24 तासात भारतात 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 535 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 39 हजार 972 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 13 लाख 71 हजार 901 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 5 लाख 43 हजार 138 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 20 हजार 551 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 8 हजार 212 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 43 कोटी 31 लाख 50 हजार 864 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.