अभिनेत्री किरण खेर यांची रक्त कर्करोगाशी झुंज

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत, जे केवळ एक उत्तम कलाकारच नाहीत, तर एक चांगले राजकारणी देखील आहेत. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत बरेच नाव कमावले आहे आणि आता राजकारणातही नाव कमावत आहेत. आज खोया खोया चांदमध्ये आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सध्या राजकारणात कार्यरत आहेत. आज आपण अभिनेत्री किरण खेर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सध्या रक्त कर्करोगाशी झुंज देत आहे.

पंजाबमध्ये जन्मलेल्या किरण खेर यांनी चंडीगडमधून पदवी संपादन केली. अभ्यासादरम्यान किरणचा कल अभिनयाकडे होता. पदवीनंतर त्या चंदीगडमधील थिएटरमध्ये दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘आसरा प्यार’ या पंजाबी चित्रपटातून केली. यानंतर तिने ‘सरदारी बेगम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

किरण खेरने बर्‍याच चित्रपटात आईची भूमिका साकारली आहे. संजय लीला भन्साळीच्या ‘देवदास’मध्ये किरणने ऐश्वर्या रायच्या आईची भूमिका साकारली होती. या पात्राने त्यांना बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळवून दिली. यानंतर, ‘वीर-झारा’, ‘ओम शांती ओम’, ‘हम-तुम’, ‘रंग दे बसंती’ अशा बर्‍याच चित्रपटांमध्ये त्या आईच्या भूमिकेत दिसल्या आणि प्रत्येक वेळी प्रेक्षकांकडून त्यांना खूप प्रेम मिळालं.

बॉलिवूडशिवाय किरण खेर यांनी टीव्ही इंडस्ट्रीमध्येही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी ‘प्रतिमा’, ‘गुब्बारे’, ‘इसी बहाने’ या सारख्या डेली सोपमध्ये काम केले. या व्यतिरिक्त त्यांनी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिअॅलिटी शोच्या परीक्षक पदाची धुराही सांभाळली आहे.

मनोरंजन विश्वात नाव कमावल्यानंतर किरण खेर यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. 2009 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. तर, 2019 मध्ये किरण खेर चंदीगडमधून लोकसभा निवडणूक लढल्या आणि जिंकल्या.

किरण खेर सध्या रक्ताच्या कर्करोगाशी लढा देत आहे. किरण खेर यांचे पती अनुपम खेर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना त्यांच्या तब्येतीची अपडेट देत असतात. किरणच्या मुलाने देखील अलीकडेच आपल्या व्हिडीओमध्ये किरण खेर यांची एक झलक दाखवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.