जळगाव : रोटरी क्लब जळगाव सेंट्रलतर्फे मुलींच्या निरीक्षण गृहामध्ये फ्लाॕवर आणि बुके डेकोरेशनचे वर्कशॉप घेण्यात आले. मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी या गोष्टीचा भविष्यात निश्चित उपयोग होऊ शकतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला.
सामाजिक जाणिवेतून रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल यांच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जळगाव येथील मुलींच्या निरीक्षणगृह मध्ये कृत्रिम फुलांपासून गुच्छे व विविध शोभेच्या वस्तू तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
हे वर्कशॉप जळगावचे सौ. भैरवी गुजराथी ह्यांनी घेतले. यामध्ये त्यांनी उपस्थित मुलींना अतिशय सुंदर रित्या फुलांची पाने कशी बनवायची व त्यानंतर त्याचा बूके कसा बनतो हे शिकवले व हे बनवण्यात जर तुम्हांला आवड असेल तर ते शिकून तुम्ही कसे आत्मनिर्भर बनू शकता आणि त्यात काय काय संधी आहेत हे समजावून सांगितले. यावेळी मुलींनी विचारलेल्या प्रश्नांना देखील त्यांनी उत्तरे दिली.
सहभागी झालेल्या सर्व मुलींनी अतिशय आनंदने, उत्साहाने हे सर्व शिकून घेतले व जिथे समजले नाही तिथे विचारले.
ह्या कार्यशाळेसाठी लागणारे सर्व साहित्य सौ. भैरवी गुजराथी ह्यांनी आणले होते व तसेच सौ. गुजराथी ह्यांनी सॅम्पल म्हणुन सुंदर असे गुलाबाची फुले, राखी, पेन्सिल ला लावलेले गुलाब व जुड्याची पिन आणली होती. हे सर्व त्यांनी सॅम्पल म्हणून तिथे दिले आणि त्याच बरोबर प्रॅक्टिस साठी 20 गुलाबाची फुले बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य त्यांनी तिथे दिले.
मुलींच्या निरीक्षण गृहाच्या अधीक्षिका सौ. जयश्री पाटील ह्यांनी भैरवी गुजराथी ह्यांच्या हया अतिसुंदर आर्ट चे कौतुक केले. त्याच बरोबर मुलींना आत्मनिर्भर करण्यासाठी ज्यांच्या मध्ये स्किल आहे व ज्यांना इंट्रेस्ट आहे त्यांना संपूर्ण प्रशिक्षण कसे देता येईल ह्याबद्दल सौ भैरवी गुजराथी व सर्वां बरोबर चर्चा केली.
ह्या कार्यशाळेला रो सौ भैरवी गुजराथी, फर्स्ट लेडी सौ. वैशाली चौधरी आणि डॉ. विद्या चौधरी व अधीक्षक जयश्री पाटील उपस्थित होते.
सौ जयश्री पाटील ह्यांनी आपल्या क्लब चे व सौ भैरवी गुजराथी ह्यांचे सदर कार्यशाळेसाठीसाठी व बहुमूल्य मार्गदर्शना साठी आभार मानले. तसेच सर्व मुलींनी ही गुजराथी ह्यांचे आभार मानले.