परिवहन विभागातील गैरव्यवहार प्रकरणी नाशिक पोलीस ठाण्यात तक्रार

आरटीओ विभागातील निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात केली पदोन्नतीमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगानं चौकशीसाठी राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे आज नाशिकमध्ये चौकशीसाठी येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अविनाश ढाकणे हे क्राईम ब्रँच युनिटकडून सखोल माहिती घेण्याची शक्यता आहे.

गजेंद्र पाटील यांनी परिवहन विभागातील गैरव्यवहार प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाटील हे नाशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते. पाटील यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पंचवटी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना दिले आहेत.

तक्रारीच्या अनुषंगानं चौकशीसाठी राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे आज नाशिकमध्ये चौकशीसाठी येतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अविनाश ढाकणे हे क्राईम ब्रँच युनिट कडून याप्रकरणाची सखोल माहिती घेणार असल्याची माहिती आहे. याशिवाय परिवहन आयुक्त तक्रारदार पाटील यांच्याशी संपर्क साधण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

आरटीओचे निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पदोन्नतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेता चौकशीच्या क्राईम ब्रँच युनिटला सूचना दिल्या आहेत.

गजेंद्र पाटील यांनी परिवहन विभागात बदल्यांचं रकेट कसं चालतं याचा पर्दाफाश आपल्या तक्रारीत केला आहे. उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे बदल्या मॅनेज करत असून अर्थपूर्ण व्यवहार करत आहेत. त्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांचं अभय आहे, असा दावा पाटील यांनी तक्रारीत केल्याची माहिती आहे.

अनिल परब यांनी एकापाठोपाठ एक सहा ट्विट करत निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. निलंबित मोटार वाहन निरीक्षक निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर 5 अधिकाऱ्यांविरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे, असं परब यांनी म्हटलं आहे. विभागातील अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.