कोरोनामुळे कुटुंबाचा आधार गमावलेल्या मदत करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहे. कोरोना काळात ज्या घरातील कर्ता माणूस किंवा आधार गमावला असेल त्यांना ESIC अंतर्गत पेन्शन दिली जाणार आहे. त्या पीडित कुटुंबियांना वाढीव विमा भरपाई देखील देण्यात येणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न 21,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल, अशा कर्मचाऱ्यांना ESIC च्या या सुविधेचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्या दिव्यांगांच्या उत्पन्नाची मर्यादा 25,000 रुपये आहे, त्यांनाही याचा फायदा मिळणार आहे.
एखाद्या कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियाला सन्मानाने आणि उत्तमरित्या जगता यावे यासाठी, रोजगार संबंधित मृत्यू प्रकरणांतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) पेन्शन योजनेचा लाभ मिळतो. त्यात आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचाही समावेश होणार आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
ESIC ने नुकतंच नवीन विशेष योजनेची तरतूद केली आहे. त्यामुळे विमाधारकाच्या सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढविली आहे. नव्या विशेष योजनेतंर्गत कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात येणार आहे. नुकतच ESIC ने IP’s च्या व्याख्या बदलली आहे.
या कुटुंबांना सन्मानाने जीवन जगण्यास आणि त्यांचे जीवनमान टिकवून ठेवण्यास मदतीसाठी तसेच रोजगाराशी संबंधित मृत्यू प्रकरणांमध्ये ESIC पेन्शन योजनेचे फायदे मिळतात. त्यात आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचाही समावेश होणार आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
या व्यक्तींच्या आश्रित कुटुंबातील सदस्यांना सध्याच्या नियमांनुसार संबंधित कामगार किंवा कर्मचार्याच्या सरासरी दैनंदिन पगाराच्या किंवा मानधनानुसार निवृत्तीवेतनाचा लाभ मिळू शकेल. हा लाभ 24 मार्च 2020 पासून लागू करण्यात येणार आहे. याबाबतच्या सर्व सुविधा या 24 मार्च 2022 पर्यंत उपलब्ध असेल.