मराठी अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचा वाढदिवस

जन्म. २ जुलै १९७३

अभिनय क्षेत्राची कुठलीही परंपरा नसलेल्या व एका मध्यमवर्गीय कुटुंबातील हर्षदा खानविलकर यांचा जन्म झाला. त्यांची जॉईंट फॅमिली होती. आई वडील धाकटी बहीण, काका-काकू, आत्या यांसह एकत्र कुटुंबपद्धतीत हर्षदा लहानाच्या मोठ्या झाल्या. मुंबईतील किंग जॉर्ज या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. किर्ती कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर हर्षदा यांनी मुंबईतील रुपारेल कॉलेजमध्ये लॉमध्ये प्रवेश घेतला. मात्र याच काळात त्यांचे अभिनय क्षेत्रात बस्तान बसत होते. १९९९ मध्ये हर्षदा यांनी ‘आभाळमाया’ या मालिकेसाठी त्यांनी ऑडीशन दिली आणि त्यांची निवड झाली. ही मालिका करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. दुरदर्शनवरील दामिनी आणि पुढे आभाळमाया मालिकांमध्ये त्यांना काम मिळाले. दामिनी आणि आभाळमाया या मालिकेतील त्यांच्या भूमिकांचे कौतुक झाले. ऊन पाऊस, कळत नकळत या मालिकांमध्ये त्यांनी काम केले. संजय जाधव यांच्यासोबत हर्षदा यांची मैत्री झाली. त्यांनी मिळून ‘हॅपनिंग्ज अनलिमिटेड’ या नावाने निर्मिती संस्था काढली. ‘बेधुंद मनाच्या लहरी’ ही त्यांची निर्मिती असलेली पहिला मालिका होती. ‘झी’वर ही मालिका लोकप्रिय झाली. अभिनयासोबतच हर्षदा खानविलकर कॉश्च्युम डिझायनरसुद्धा आहेत. ‘बेधुंद मनाच्या लहरी’ या मालिकेसाठी संजय जाधव यांनी हर्षदा यांना कॉश्च्युम डिझायनिंग करायला सांगितले त्यानंतर त्यांनी अनेक मालिका आणि सिनेमांसाठी कॉश्च्युम डिझायनिंग केले आहे. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत ”आक्कासाहेब” या कणखर स्त्रीच्या व्यक्तिरेखेतून हर्षदा खानविलकर या घराघरांत पोहोचल्या. तब्बल सहा वर्षे या मालिकेतून हर्षदा आक्कासाहेबांच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. ही भूमिका त्यांच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक ठरली आहे.

संजीव वेलणकर, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.