देशी गायीच्या दुधाचे फायदे

दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी आणि विशेषतः हाडांसाठी फायदेशीर असतं. हे तर आपल्याला ठाऊकच आहे, पाकिटाचे दूध पिण्याऐवजी देशी गायीचे ताजे A2 टाईप दूध पिण्याने तर आपल्याला वेगळे आणि बहुमूल्य फायदे मिळतील.

◼ एखाद्या मुलाचा किंवा व्यक्तीच्या बौद्धिक विकासासाठी देशी गायीचे दूध खूप फायदेशीर आहे. मेंदूसाठी अजून कोणतेही दूध देशी गायीच्या दुधा इतके फायदेशीर नाही.

◼ देशी गायीचे दूध पचनासाठी उत्कृष्ट असतं. ह्याला पचविण्यासाठी पचन तंत्राला जास्त कष्ट घ्यावे लागत नाही. पचन तंत्राच्या समस्यांमध्ये हे फायदेशीर आहे.

◼ पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमतरता असल्यास देशी गायीचे दूध पिणे एक प्रभावी उपाय आहे. देशी गायीचे दूध वीर्याला दाट करून शुक्राणूंची संख्या वाढवते आणि बळकट करते.

◼ दररोज देशी गायीच्या दुधाचे सेवन करणे टीबी (क्षयरोगाचा) च्या रुग्णांसाठी फायदेशीर असतं. त्याच बरोबर दररोज रात्री नियमाने देशी गायीच्या दुधाचे सेवन केल्याने आबाळ वृद्धांना देखील बळ मिळतं.

◼ पित्ताशी निगडित सर्व समस्यांच्या निरसनासाठी देशी गायीचे दूध खूप फायदेशीर आहे. हे शरीराला तेज आणि शक्ती (ओज ) देतं. गॅसच्या त्रासांपासून सुटका मिळतो.

◼ लहान मुलांमध्ये मुडदूस (रिकेट्स) झाल्यास देशी गायीचे दूध बदामासह घेतल्यास हे औषधाप्रमाणे काम करतं. हे रक्तपेशींना वाढविण्यास मदत करते.

◼ चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी देशी गायीच्या दुधाचा वापर केला जातो. देशी गायीच्या कच्च्या दुधाने चेहऱ्यावर मालिश केल्याने त्वचा नितळ, तजेल आणि स्वच्छ होते.

◼ गायीच्या दुधात आढळणारा पिवळा पदार्थ कॅरोटीन आहे. जे डोळ्यांची दृष्टी वाढवून डोळ्यांचे सौंदर्य वाढवतं.

◼ कर्करोग, टीबी, कॉलरा सारख्या गंभीर रोगांवर देशी गायीचे दूध अमृत मानले गेले आहे. मुलांना संपूर्ण प्रकारे पोषण देण्यासाठी हा एकमेवच पदार्थ सक्षम आहे. कारण दूध एक संपूर्ण आहार आहे.

◼ औषधांच्या रसायनामुळे शरीरामध्ये बनणारे विष आणि त्यांचा आपल्या शरीरांवर होणाऱ्या दुष्परिणामांचे प्रभाव कमी करण्यासाठी देशी गायीचे दूध प्रभावी आहे.


डॉ.प्रविण केंगे,नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.