कोकाटे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात कोरोना नियमांना पायदळी

डेल्टा प्लस कोरोना विषाणू तसेच कोरोनाची संभाव्य तिसरी लाट यामुळे राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, असे असले तरी काही राजकीय व्यक्तींकडूनच कोरोना नियमांचं उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात कोरोना नियमांना पायदळी तुडवण्यात आले. या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते.

कोकाटेंच्या मुलीच्या लग्नात कोरोना नियमांचे उल्लंघन
नाशिक तालुक्यातील गंगावार्हे परिसरातील एका खासगी रिसॉर्टवर सिन्नरचे राष्ट्रवादी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मुलीचा विवाह सोहळा आज (1 जुलै) पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, क्रीड़ामंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हजेरी लावली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्ज़ा उडाला होता. यासोबतच आमदार कोकाटेंसह अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हते.

हा प्रकार समोर आल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी “मी लग्नाला गेलो होतो तेव्हा 100 टक्के लोकांना मास्क होते. बंधन पाळणं प्रत्येकाला आवश्यक असून गर्दी करून चालत नाही. काही बाबतीत नाईलाज असतो. मात्र एखादी चूक झाली तर मी चूकच म्हणतो,” अस त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.

दरम्यान, सोलापुरात संचारबंदी लागू असतानाही आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर पोलिसांनी भांदवि कलम 188, 336, 269 नुसार गुन्हा दाखल केलाय. पडळकर यांच्यासह 10 ते 15 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर पडळकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर जरुर करा. पण मग हिंमत असेल तर पुण्यात हजारोंची गर्दी जमा करणाऱ्या अजित पवारांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.