जून महिना संपून जुलै महिन्यातील 10 दिवस उलटले तरी पावसानं दडी मारल्यानं नाशिक शहरावरील पाणी कपातीचं संकट अधिक गडद झालं आहे. नाशिककला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा राहिला आहे. जलंसपदा विभागानं नाशिक महापालिकेला पाणी कपात करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. नाशिक जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यातील 24 लहान मोठ्या धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा शिल्लक राहिला असल्यानं नाशिकककरांवर पाणी कपातीचं संकट ओढावणार हे निश्चित झालं आहे.
नाशिक शहरवासियांवरील पाणीकपातीचे संकट गडद झालं आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने पाणी कपातीच संकट ओढावलं आहे. गंगापूर धरणातील पाणी साठा गत वर्षीच्या तुलनेत कमी असल्यानं जलसंपदा विभागानं पालिकेला पाणी कपात करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. पाणी जपून वापरण्या बरोबरच अतिरिक्त पाणी वापरल्यास दंडात्मक दरात आकारणी करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कडूनही पालिका अधिकाऱ्यांना वेळीच पाणी कपातीचा निर्णय घेण्याचे आदेश यापूर्वीचं देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील लहान मोठ्या धरणांमध्ये केवळ 27 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये पाणीसाठा कमी होत असल्यानं पाणी कपातीचं संकट उभं राहिलं आहे.
नाशिक जून महिना संपून जुलैचे दहा दिवस उलटले तरी जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. बळीराजा ही सध्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. पावसानं दडी मारल्यामुळे ग्रामीण भागात शेतीची कामं देखील मंदावली आहेत. पाऊस कमी प्रमाणात राहिल्यास नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाच सावट निर्माण झालं आहे.