MSME या भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचे इंजिन आहेत. त्यांच्या आवश्यकतांना समर्थन देणे आणि त्यांच्या विकासाला हातभार लावणे हा देशाच्या विकासाला चालना देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. झेड प्रमाणपत्र हे या वाढीला कित्येक पटीने वाढवण्याचे कार्य करणारा घटक ठरतो.
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेले, GDP मध्ये 30% योगदान असणारे 114 दशलक्ष लोकांना रोजगार देणारे आणि भारतीय निर्यातीतील 50% योगदान देणारे आहेत भारतातील MSME (सूक्ष्म, लघु आणि मध्यम आस्थापना). नुसत्या MSME चे डिजिटलीकरण केल्याने 2024 पर्यंत भारताच्या जीडीपीमध्ये $158 ते $216 बिलियनची भर पडू शकेल.
आजच्या काळासारखा MSME उद्योग म्हणून कार्य करण्यासाठी उत्तम काळ कधीच नव्हता. खाजगी गुंतवणुका वेगाने वाढत आहेत, धोरणातील बदलांमुळे उद्योग चालू करून तो चालवणे आजपर्यंतचा सर्वोत्तम काळ आलेला आहे आणि भारतामधील पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील गुंतवणुकांमुळे उद्योगधंद्यांचा आवाका कित्येक पटीने वाढतो आहे. इंडिया स्टॅकच्या माध्यमातून भारताची तंत्रज्ञानातील सक्षमतेचे दर्शन घडून येते आहे, जे करोडो व्यक्ती आणि उद्योगांनी अंगीकारले आहे आणि यातून आर्थिक आणि सामाजिक समावेशीत्वाचा नवीन काळ येऊ घातला आहे. भारताचे जगातील महत्त्वाच्या राष्ट्रांमध्ये मनुष्यबळ पुरवणारा सर्वाधिक मोठा पुरवठादार देश म्हणून महत्त्वाचे स्थान आहे, खासकरून अशा वेळी जेव्हा जगातील बहुतांशी प्रगत देशांमधील लोकसंख्या वेगाने वृद्धत्वाच्या दिशेने झुकत चालली आहे.
या उद्योगांच्या शक्तीला अधिकाधिक कार्यरत करणे हे भारताची अर्थव्यवस्था $5 बिलियनवर नेण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचा स्पष्टपणे महत्त्वाचा मार्ग आहे. हे ध्येय असल्याचे भारतीय गुणवत्ता मंडळाकडून (QCI) सांगण्यात आले आहे. QCI हे प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या उद्योगांची एक पूर्वनिर्मित शृंखला तयार करून त्यांच्याद्वारे एक सर्वसमावेशक विकास साधण्यातून भारताला आपले जागतिक नेतृत्वाचे स्थान निश्चित करण्याच्या दृष्टीने सक्षम बनवत आहे. या ध्येयाचे महत्त्वाचे घटक एकत्रित बांधल्याने MSME मंत्रालयाच्या छत्रछायेखाली झिरो डिफेक्ट, झिरो इफेक्ट (ZED) प्रमाणपत्र कार्यक्रम साध्य केला जातो. ZED प्रमाणपत्र कार्यक्रम विकासाची लोकांसाठी चांगले आणि पृथ्वीसाठी देखील चांगले ही संकल्पना स्पष्ट करण्याच्या दृष्टीने आखण्यात आला आहे.
झिरो डिफेक्ट म्हणजे भारतीय उद्योगांनी गुणवत्तेच्या उच्च मानकांचे पालन केले पाहिजे. यामुळे त्यांना पूर्णपणे स्पर्धात्मक बनवण्यास वाव मिळतो आणि त्यांची मागणी व प्रतिष्ठा केवळ भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये सर्वत्र सकारात्मकरीत्या वाढीस लागते. यामुळे अधिकाधिक भारतीय उद्योगांनी या मानकांची पूर्तता केल्यामुळे भारताला गुणवत्तेच्या, वक्तशीरपणा आणि प्रामाणिकपणाच्या जागतिक स्तरांशी ओळख झाल्यामुळे बहुगुणात्मक परिणाम घडून येतो.
झिरो इफेक्ट म्हणजे भारतीय उद्योग पर्यावरणावर दुष्परिणाम न होऊ देता उच्च गुणवत्तेच्या वस्तू आणि सेवा निर्माण करण्यासाठी उद्योगांनी नवनवीन मार्ग शोधावेत यासाठी त्यांवर घालून दिलेल्या कठोर मागण्यांची पूर्तता करण्यासाठी असलेल्या आक्रमक हरित मानकांचे पालन करतील. जशी याची स्वीकारार्हता वाढत जाईल तसे भारतीय उद्योग हे पर्यावरण आणि आर्थिकदृष्ट्या उद्योग शाश्वत कसा बनवावा यासाठीचा मापदंड ठरवून देतील.
या कार्यक्रमाच्या विशाल परिणामामुळे सर्व भारतीय उद्योगांना सक्षम बनवण्याबरोबरच ZED योजनेमध्ये MSME साठी, विकास साधण्यासाठी प्रचंड क्षमता आहे. दोन स्तरांवर अंमलबजावणी होत असताना ZED प्रमाणपत्र हे आता उत्पादने आणि सेवांसाठी लागू होते. ZED प्रमाणित MSME या त्यांच्या ग्राहक, गुंतवणूकदार, पुरवठादार आणि कर्मचार्यांच्या मनात गुणवत्ता, मूल्य आणि प्रामाणिकपणाबद्दल हमी राहते, ज्यामुळे त्यांच्यातील सर्वोत्तम घटकांना आकर्षित करण्याची संधी निर्माण होते. यामुळे क्षमतेच्या दृष्तीकोनातून – मग कोणत्या पुरवठादारांशी करार करावा याबाबतचा असेल, कुणाला नोकरीवर घ्यावे किंवा कुणाकडून गुंतवणूक स्वीकारावी अशा प्रकारचे निर्णय घेण्याबद्दलची त्यांची क्षमता वाढवते. त्याचप्रमाणे ZED प्रमाणित MSME ना कर्जपुरवठ्याच्या बाबतीत प्राधान्य दिले जाते आणि ते प्रक्रिया शुल्क आणि बॅंकांच्या व्याजदरामध्ये सवलत मिळवण्यासाठी देखील पात्र असतात. त्यांचे क्रेडिट रेटिंग देखील उत्तम असते.
असे असताना त्यांची उत्पादने आणि सेवा हे दोन्ही उच्च गुणवत्ता आणि शाश्वती मानकांवर योग्य ठरतात, ZED प्रमाणित MSME नवनवीन बाजारपेठा आणि त्यांच्यासाठी खुल्या असलेल्या भौगोलिक प्रदेशांचा शोध घेतात, विशेषकरून जेव्हा पाश्चिमात्य देशांमध्ये निर्यात करण्याचा प्रश्न असेल. GOI भारतामध्ये आणि परदेशांमध्ये व्यापारी प्रदर्शनांमध्ये स्टॉलचे शुल्क, विमान प्रवास खर्च आणि वहनावळीच्या खर्चामध्ये अनुदान देऊन तेथे सहभागी होणे सोपे करते.
मात्र योजनेचा लाभ घेण्यासाठी MSME ना ZED प्रमाणपत्रासाठी पात्र ठरण्याची वाट पाहण्याची गरज नाही. ZED प्रमाणपत्राची प्रक्रिया हीच उद्योगांना त्यांच्यात कुठे कमतरता आहे, त्यांना उद्योग म्हणून सुधारण्यासाठी कशामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे हे जाणून घेण्यासाठी मदत करते. QCI सल्लागार हे उद्योगांमधील कमतरतांचे विश्लेषण करण्यासाठी त्या उद्योगांचा जवळून अभ्यास करतात, ज्यापाठोपाठ मूलभूत माहितीपासून सल्लागारीतेपर्यंत मदत करून त्यांची मानांकने वाढवण्यात मदत करतात. ही मानांकने सुधारली की उद्योगाची सक्षमता आणि सामर्थ्य देखील वाढीस लागते.
अशारीतीने उद्योगांना आपली क्षमता बांधणी करता येते. उत्पादकता सुधारून आणि पहिल्याच वेळी मार्ग मोकळा मिळण्याचा दर वाढवून त्यातून दोष, पुन्हा काम करावे लागण्याची शक्यता आणि कचरा कमी करता येईल थोडक्यात त्यांचे ROI अधिक होईल. वेळेवर डिलीव्हरी करणे आणि ग्राहकांच्या तक्रारी कमी केल्याने ब्रॅंडची किंमत आणि पत वाढण्यास मदत होते आणि ज्यातून वारंवार उद्योग संधी मिळत राहतात.
ZED प्रमाणपत्रासाठीची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. 5 टप्प्यांची प्रक्रिया येथे दिली आहे:
मोफत ऑनलाइन नोंदणी आणि MSME ची शपथ
मूलभूत माहिती आणि दस्तऐवज अपलोड करा
अपलोड केलेल्या माहितीच्या आधारावर डेस्कटॉप / रिमोट / ऑन साइट परीक्षण
प्रमाणपत्र प्राप्त करा आणि प्रमाणपत्र अॅपवरून डाउनलोड करा
लाभ मिळवा.
स्वारस्य असलेल्या पार्टी येथे प्रक्रियेला सुरूवात करू शकतात.
ZED प्रमाणपत्रामध्ये तीन टप्पे असतात – ब्रॉंझ, सिल्व्हर आणि गोल्ड. MSME त्यांच्या तयारीनुसार यांतील कोणत्याही प्रमाणपत्र पातळ्यांसाठी नोंदणी करू शकतात. आणखी MSME ना नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी MSME मंत्रालयाने सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराच्या आस्थापनांसाठी अनुक्रमे 80%, 60% आणि 50% अनुदान जाहीर केले आहे. MSME मंत्रालयाने राज्य सरकारे, विविध मंत्रालये,वित्तसंस्था आणि बॅंकांना देखील यासाठी सज्ज केले आहे ज्यातून ते मोटःया प्रमाणावर अनुदाने देत आहे. योजनेबद्दलचे आणि लाभांबद्दलचे अधिक तपशील येथे पाहता येतील.
मात्र ZED प्रमाणपत्र हे इतर सर्व उपलब्धींप्रमाणे सहजासहजी मिळत नाही. ZED परिपक्वता परीक्षा मॉडेल हे MSME ना मानांकन देण्यासाठी, त्याचे परीक्षण करण्यासाठी आणि हाताला धरून शिकवण्यासाठी आहे व त्यांना उच्च परिपक्वता पातळ्यांच्या दृष्टीने सज्ज करण्यासाठी, जागतिक स्पर्धेमध्ये उतरण्याच्या दृष्टीने तयार करण्यासाठी आहे.GOI he ZED योजनेकडे एक असा खटका म्हणून पाहते जो अर्थव्यवस्थेला 2026 पर्यंत $5 ट्रिलियन पर्यंत जाण्यास आणि त्यानंतर 2033 पर्यंत $10 ट्रिलियनवर नेईल. हे परिणामकारक ठरण्यासाठी ते तितकेच कठोर असण्याची देखील आवश्यकता आहे.
ZED कार्यक्रमासह, QCI आपला भारतामध्ये गुणवत्तेचा स्तर वाढवण्यातील 25 वर्षांचा अनुभव पणाला लावत आहे. ज्यातून एक अशी इकोसिस्टम तयार होईल जी MSME ना त्यांच्या सामर्थ्यवान क्षेत्रामध्ये आत्मविश्वासाने पाऊल टाकण्यास मदत करू शकेल.