घरात कोरोनाचा रुग्ण असल्यास ही काळजी घ्या…

या ५ गोष्टींचा करा अवलंब आणि स्वतःचा बचाव करा

जेव्हा डॉक्टरांकडून होम आयसोलेशनचा सल्ला दिला जातो, तेव्हा संबंधीत रूग्ण आणि त्याच्या कुटुंबियांनी मोठी काळजी घेणे आवश्यक असते. काही नियम आहेत ज्यांचे होम आयसोलेशनमध्ये रहात असताना पालन करणे गरजेचे असते. आम्ही आपल्याला काही असेच उपाय सांगत आहोत, जे अवलंबून तुम्ही तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यासह इतर लोकांना धोक्यापासून वाचवू शकता.

1 सतत मास्क घाला
कोरोनाचा रूग्ण वेगळ्या खोलीत असला तरी घरात सतत मास्क घाला. मास्कला स्पर्श करू नका. मास्क काढल्यानंतर हात स्वच्छ धुवा.

2 हात वारंवार धुवा
ऑक्सीजनची देखरेख, जेवण देणे, औषधे देणे, अशाप्रकारची अनेक कामे घरातील कोरोना रूग्णांची करावी लागतात.

अशा कामानंतर हात स्वच्छ धुवा. डोळे, तोंड आणि नाकाला स्पर्श करू नका.

3 वेगळ्या भाड्यांचा वापर करा
रूग्णांसाठी वेगळ्या भांड्यांचा वापर करा. ही भांडी मास्क, हँडग्लोव्हज वापरून गरम पाण्यात धुवून काढा. हात साबणाने स्वच्छ धुवा.

4 पृष्ठभाग स्वच्छ करत रहा
स्विचबोर्ड, टेबलटॉप, रिमोट, टॅप्स इत्यादी वारंवार स्पर्श होणारे पृष्ठभाग सॅनिटाइज करा. घरात एकच बाथरूम असेल तर रूग्णाला ते शेवटी वापरू द्यावे, त्याच्या वापरानंतर आतील सर्व वस्तू सॅनिटाइज करा.

5 स्वत:च्या आरोग्यावर लक्ष ठेवा
कोरोना रूग्णाची देखभाल करताना तुमच्या आरोग्याची सुद्धा देखरेख करा. खोकला, ताप, श्वासाचा त्रास सारख्या लक्षणांकडे लक्ष ठेवा. जवळचा संपर्क असेल तर तुम्ही 14 दिवसासाठी घरीच वेगळे रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.