मुंबईचा एक कुख्यात गुंडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या गुंडाचं नाव शम्स अली सय्यद उर्फ जॉनी असं आहे. त्याने घरात 500 आणि 2000 च्या नोटांचे बंडल पसरवून ठेवल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्यापैकी एक बंडल तो मुलीच्या हातात खेळण्यासाठी देतो. संबंधित व्हिडीओत ते स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होतोय.
शम्स अली सय्यद उर्फ जॉनी याने स्वत: याबाबतचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. थोड्या वेळाने त्याला आपली चूक लक्षात आली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. कारण अनेकांनी तो व्हिडीओ व्हायरल केला होता. शम्सला काही दिवसांपूर्वी अटकपूर्व जामीन मिळाला आहे. मात्र, या नव्या व्हिडीओमुळे तो पुन्हा पोलिसांच्या रडारवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय शम्स ह्याने गुन्हे क्षेत्रात वयाच्या 16 व्या वर्षी प्रवेश केला. त्याच्यावर सध्या चेन स्नॅचिंग, लूट, फसवणूक आणि हत्या करण्याच्या प्रयत्न सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी आपल्याच कुटुंबातून मिळाली आहे. कारण त्याचे वडील समीर अली सैयद उर्फ डिग्गीवरही अनेक गुन्हे दाखल आहेत. डिग्गीने सप्टेंबर 2020 मध्ये क्रॉफर्ड मार्केट जवळ कॅफे जनतामध्ये अनियंत्रित गतीने कार चालवून 5 जणांवर चिरडलं होतं.
शम्स ह्याला ताहा डोसा याच्यावर जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जमीन मिळाला आहे. त्याने 7 मे 2021 रोजी चाकूने डोसावर हल्ला केला होता. त्यानंतर त्याच्यावर जेजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्याच्या दोन साथीदारांना सुद्धा जमीन मिळाला आहे. या प्रकरणी पीडित डोसाने सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितली होती.
“रमजानच्या महिन्यात मी रात्री 11 वाजता आपल्या कामावरून परत आलो होता. मी घराजवळ बेकरीवर ब्रेड घेण्यासाठी गेलो तेव्हा माझा मित्र दानिश सुपारीवालासोबत बोलत होता. त्याचवेळी शम्स तिथे आला आणि त्याने मला शिवीगाळ द्यायला शुरुआत केली. त्याने मैदान जवळ यायचं नाही, अशी धमकी दिली. नंतर तो त्याच्या ३ साथीदारांसोबत परत आला. त्याने चाकूने हल्ला केला”, अशी माहिती डोसाने दिली होती.