विधान परिषद निवडणुकीसाठी एक एक आमदाराच्या मताला मोठी किंमत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले आहे. पण, पुण्याच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक या सर्व आमदारांसाठी आदर्श ठरल्या आहे. प्रकृती अत्यंत नाजूक असतानाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुण्याहून मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.
भाजपच्या कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक या विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानासाठी पुण्याहून रवाना झाल्या आहेत. मुक्ता टिळक यांची प्रकृती दुर्धर आजाराने अत्यंत नाजूक आहे. पण, पक्षाचा आदेश हा रक्तात भिणलेला असं सांगत मुक्ता टिळक यांनी मतदानाचा हक्क बजावणारच असं ठामपणे सांगितलं आहे.
आज मतदान आहे, सर्वपक्षांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली आहे. भारतीय जनता पार्टी मागे कशी राहिल. पक्षाने आदेश दिले असून पहिल्यापासून पक्षाचा आदेश पाळणे हे आमच्या रक्तात भिणलेलं आहे. त्यामुळे पक्षासाठी मतदान करण्यासाठी निघाले आहे, असं टिळक यांनी ठामपणे सांगितलं.