विधान परिषदेत कोण मारणार बाजी?

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद निवडणुकीला आता थोड्यात वेळात सुरूवात होणार आहे. राज्यसभेत दगाफटका झाल्यामुळे शिवसेनेसाठी ही अग्निपरिक्षा ठरणार आहे. तर राष्ट्रवादीकडून दोन उमेदवार मैदानात असून एकनाथ खडसे यांना आमदारकीची संधी चालून आली आहे. तर काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे तिसरा उमेदवार निवडून कसा आणणार हे पाहण्याचे ठरणार आहे. भाजपसाठीही पाचवा उमेदवार विजयी करण्याचे गणित अवघड असून देवेंद्र फडणवीस खरंच चमत्कार घडवणार का हे पाहण्याचे ठरणार आहे.

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आता थोड्यात वेळात मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे.  विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार आज सकाळी 7 वाजताच पवई इथल्या वेस्टिन हॉटेलमधून विधान भवनाच्या दिशेने निघणार आहेत. विधान भवनात ८:३० पर्यंत शिवसेना आमदारांची बस पोहोचेल.

त्यानंतर विधान भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात शिवसेना आमदारांची बैठक होणार आहे. याच बैठकीत शिवसेना आणि समर्थक अपक्ष आमदारांना कोणी कुणालं कसं मतदान करायचं यांचे आदेश दिले जातील. त्यानंतर सकाळी 9 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री सकाळी १०:३० च्या सुमारास विधान भवनात येतील आणि शिवसेना आमदारांच्या मतदानाचा आढावा घेतील.

दरम्यान, सत्ताधारी महाविकास आघीडीसोबतच विरोधी पक्ष भाजपनेही त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवलंय. कारण मतदार फुटण्याचा धोका जसा महाविकास आघाडीतील पक्षांना आहे तसाच तो भाजपलाही आता आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अपक्ष आमदार फुटले आणि त्याचा मोठा फायदा भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी झाला. हाच धोका टाळण्याचं प्रमुख आव्हान आता महाविकास आघाडीतील तीनही पक्षांसमोर आहे.

महाविकास आघाडीतील पक्षीय संख्याबळ पाहीलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून येतील एवढं संख्याबळ या दोन्ही पक्षांकडे आहे. काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येईल. मात्र दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्याचं आव्हान काँग्रेससमोर आहे. त्यासाठी त्यांना पहिल्या पसंतीच्या 10 मतांची गरज आहे. काँग्रेसला ही अतीरिक्त मतं पुरवण्यासाठी आवश्यक असलेली मतं शिवसेनेकडे आहेत. शिवसेनेकडे लहान पक्षांचे आणि अपक्ष आमदारांची मिळून 10 अतिरीक्त मतं आहेत. शिवसेनेच्या अतिरीक्त मतांवरच काँग्रेसच्या दूसऱ्या उमेदवाराचा विजय अवलंबून आहे. त्यासाठी महाविकास आघाडी एकत्रित मतांचं समीकरण योग्य पद्धतीने कसं बसवतंय याकडे सर्वाचं लक्ष असेल.

दुसरीकडे भाजपचे 4 उमेदवार सहज निवडून येतील एवढं संख्याबळ भाजपकडे आहे. मात्र भाजपचा पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला मोठं राजकीय कसब वापरावं लागणार आहे. त्यातही भाजपकडे लहान पक्ष आणि अपक्षांची अशी 8 अतिरिक्त मतं आहेत. त्यातच राज्यसभा निवडणुकीत भाजपने 9 आमदारांची मतं फोडण्यात यश मिळवलं होतं. भाजपला ही मतं विधान परीषदेतही मिळाली तर त्यांच्याकडे एकूण 123 मतं होत आहेत. त्यामुळे भाजपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी 7 मतं कमी पडत आहेत. त्यासाठी भाजपला महाविकास आघाडीची आणखी 7 मतं फोडावी लागणार आहेत. तरंच भाजपच्या पाचही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी 130 मतांचा जादुई आकडा गाठता येईल.

भाजप

१. प्रविण दरेकर

२. श्रीकांत भारतीय

३. राम शिंदे

४. उमा खापरे

५. प्रसाद लाड

भाजपचे आमदार 106 + लहान पक्ष आणि अपक्ष आमदार 8 + राज्यसभा निवडणुकीत फोडलेले आमदार 9 = 123 (पाचवा उमेदवार जिंकण्यासाठी आणखी 7 मतांची गरज आहे.)

शिवसेना

१. सचिन अहिर

२. आमशा पाडवी

शिवसेना आमदार 55 + लहान पक्ष आणि अपक्ष आमदार 10 = 65 आमदार

राष्ट्रवादी काँग्रेस

१. रामराजे नाईक निंबाळकर

२. एकनाथ खडसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार 51 + अपक्ष 3 = 54 ( MIMच्या एका आमदाराने NCP ला समर्थन जाहीर केलंय. )

काँग्रेस

१. चंद्रकांत हंडोरे

२. भाई जगताप

काँग्रेसचे 44 आमदार आहेत. त्यांना दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी 10 मतांची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.