पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून (दि. १७ सप्टेंबर) ते महात्मा गांधी जयंती (दि. २ ऑक्टोबर) या कालावधीत भारतीय जनता पार्टीतर्फे ‘सेवा पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. अलिबाग तालुक्यात देखील भारतीय जनता पार्टीतर्फे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजउपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती भाजपा अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे यांनी दिली. या सेवा पंधरवाडय़ात १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदीजींच्या वाढदिवसानिमित्ताने अलिबाग शहरात विविध ठिकाणी ‘रक्तदान शिबीर’ श्री गणेश मंदिर सभागृह, ब्राह्मण आळी, अलिबाग येथे भाजपा अलिबाग शहर अध्यक्ष अॅड. अंकित बंगेरा, तालुका उपाध्यक्ष सुनील दामले, तालुका सरचिटणीस अजित भाकरे, शंकर भगत, निखील चव्हाण, जनार्दन भगत, देवेन सोनावणे, अॅड. पल्लवी तुळपुळे, अॅड. रोशनी ठाकूर आणि भाजपा कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले आहे. १९ सप्टेंबर रोजी रामराज येथे धावीर मंदिर, नांगरवाडी येथे रक्तदान शिबीर भाजपा अलिबाग तालुका उपाध्यक्ष, बोरघर ग्रामपंचायत सदस्य रमेश ढबुशे, विभाग अध्यक्ष अजिंक्य पाटील, चंद्रकांत झावरे, आतीष गायकवाड, सुदाम झावरे, अमर ठाकूर, मोहन शेठ, मयूर झावरे यांनी आयोजित केले आहे. २० सप्टेंबर रोजी सुंदर नारायण मंदिर, चौल नाका येथे रक्तदान शिबीर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आलाप मढवी आणि युवा मोर्चा कार्यकर्ते यांनी आयोजित केले असून त्यांना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दांडेकर, जिल्हा कोषाध्यक्ष सतीष लेले, जिल्हा चिटणीस समीर राणे, केदार आठवले, माणिक बळी, दिलीप पटेल, गजानन झेंडेकर, विश्वास जोशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.