विंदू दारा सिंग हे ज्येष्ठ अभिनेते दारा सिंग यांचे चिरंजीवआहेत. विंदू दारा सिंग यांनी १९९४ मध्ये आलेल्या ‘करण’ या चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर १९९६ साली आलेल्या पंजाबी चित्रपट ‘रब दिया राखा’मध्ये अभिनय केला. यानंतर ते बर्याच पंजाबी चित्रपटांमध्ये दिसले.पुढे पंजाबी चित्रपटांव्यतिरिक्त विंदू यांनी हिंदी चित्रपटांमध्येही आपला हात आजमावला आणि सलमान खानबरोबर ‘गर्व ‘, ‘मैने प्यार क्यूं क्या’, ‘पार्टनर’ या चित्रपटात काम केले.
‘किससे प्यार करूं’, ‘कमबख्त इश्क’, ‘मारुति’, ‘मुझसे शादी करोगी’ व ‘हाउसफुल’ या चित्रपटात विंदू दारा सिंग दिसले होते. अभिनेता म्हणून विंदू दारा सिंग २०१४ मध्ये आलेली ‘जाट जेम्स बांड’ मध्ये दिसले होते. त्यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. ‘जय वीर हनुमान’ या मालिकेत विंदू यांनी हनुमानची भूमिका साकारली होती. पण त्याला म्हणावे तसे अभिनय क्षेत्रात यश मिळाले नाही. विंदू यांनी २००९ मध्ये ‘बिग बॉस सीझन 3’ या कार्यक्रमात भाग घेतला होता. ‘बिग बॉस सीझन 3’ जिंकला.
विंदू त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा कॉन्ट्रोव्हर्सींमुळे जास्त चर्चेत असतात. ‘बिग बॉस सीझन 3’ जिंकल्यानंतर अभिनेत्याची कारकीर्द पुन्हा रुळावर आल्यासारखे वाटले. पण जे घडलं ते उलट. २०१३ मध्ये विंदू दारा सिंगचे नाव आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये दिसले. अगदी विंदूला पोलिसांनी अटक केली. तथापि, त्यावेळी स्थानिक न्यायालयाने विंदूला जामीन मंजूर केला.तसेच एका सेक्स रॅकेट संदर्भात देखील त्यांचे नाव गाजले होते. विंदू यांनी पहिले लग्न अभिनेत्री फराह नाझ सोबत झाले होते. पण काहीच वर्षांत त्यांनी घटस्फोट घेतला. फराह ही नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने गोविंदासोबत तर अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ती अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण आहे. फराह गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. विंदू दारा सिंग आणि फराह यांची ओळख नव्वदीच्या दशकात एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. विंदू आणि फराह काहीच महिन्यात एकमेकांच्या प्रेमात पडले. पण त्यांच्या दोघांच्याही घरातील मंडळी या नात्याच्या विरोधात होते. फराहने एखाद्या सेटल व्यक्तीशी लग्न करावे असे तिच्या घरातील लोकांना वाटत होते तर घर सांभाळणाऱ्या मुलीसोबत विंदूने लग्न करावे अशी दारा सिंग यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी ब्रेकअप केले.