आज दि.३ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

युद्ध सुरू झाल्यापासून कोणतीही
मदत मिळालेली नाही

रशियन सीमेजवळील युक्रेनमधील ईशान्येकडील शहर सुमी येथील सुमी विद्यापीठात अडकलेल्या ४०० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे की युद्ध सुरू झाल्यापासून त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. भारतीय दूतावासाने त्यांना जागेवर राहण्यास सांगितले आहे परंतु सरकारकडे त्यांच्यासाठी काही निर्वासन योजना आहे का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विद्यापीठातील आठ विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे भारत सरकारला त्यांची सुटका करण्याची विनंती केली.

रशियन उद्योजकाने दिली
पुतिन यांना पकडण्यासाठी ऑफर

रशियन उद्योजकाने पुतिन यांना जिवंत अथवा मृत अवस्थेत आपल्या समोर आणणाऱ्यास १ मिलियन अमेरिकन डॉलर्स (साडेसात कोटी रुपये) देण्याची ऑफर दिलीय. पुतिन यांना जिवंत अवथा मृत पकडून आणणाऱ्याला बक्षीस देण्याची ही ऑफर अ‍ॅलेक्स कोनानिखिन या उद्योजकाने दिलीय. रशियामध्येही मोठ्या प्रमाणात पुतिन यांनी शेजारच्या देशावर चढवलेल्या हल्ला फारसा लोकांना पटलेला नाही. त्यामुळेच रशियामधूनही पुतिन यांना विरोध केला जातोय. याच विरोधाचा एक अजब नमुना नुकताच एका रशियन उद्योजकाच्या पोस्टमधून पहायला मिळाला.

रशियन सैनिक घाबरलेली मुलं
आहेत : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी काल रात्री आपल्या भाषणात व्लादिमीर पुतिन यांच्या रशियन सैन्याचे मनोबल सतत खालावत असल्याचा दावा केला आणि त्यांच्या सैन्याने आतापर्यंत ९,००० आक्रमणकर्त्यांना ठार मारलं असल्याचं सांगितलं. ते पुढे म्हणाले,”सर्व बंदिवान फक्त एकच सांगतात ते इथे का आहेत हे त्यांना माहीत नाही. शत्रूचे मनोधैर्य सतत खालावत आहे. झेलेन्स्की यांनी रशियन सैन्याने अन्न पुरवठ्यासाठी हताश होऊन लुटल्याचा आरोपही केला.

निवृत्तीचे वय आणि पेंशनची
रक्कम वाढवण्यावर विचार

केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना लवकरच खूशखबर देण्याचा विचारात आहे. कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय आणि पेंशनची रक्कम वाढवण्यावर विचार करीत आहेत. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीतर्फे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यामध्ये देशातील लोकांचे काम करण्यासाठी वयोमर्यादा वाढवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. देशात निवृत्तीचे वय वाढवण्यासोबतच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही सुरू करावी. असाही प्रस्ताव समितीने ठेवला आहे.

नवाब मलिक यांच्या अडचणी वाढ,
ईडी कोठडी 7 मार्च पर्यंत वाढवली

महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढत आहेत. विशेष पीएमएलए न्यायालयाने त्याला ७ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. मनी लॉन्डिरग प्रकरणात महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीच्या कोठडीतून दिलासा मिळालेला नाही. नवाब मलिकांना सात मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नवाब मलिक यांना ईडीने गेल्या आठवड्यात अटक केली असून ते कोठडीत आहेत.

मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल
सर्वोच्च न्यायालयाने नाकारला

ओबीसी आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. आता पुढच्या आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण नसेल असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. आज याविषयीची सुनावणी झाली आहे. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय
निवडणुका घेऊ नका : भुजबळ

न्यायालयाच्या निर्देशांनंतर देखील राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, ही राज्य सरकारची भूमिका कायम असल्याचं भुजबळांनी सांगितलं. “मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्याबाबत निर्णय घेतला जाईल. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका, ही आमची भूमिका आधीपासून आहेच”, असं भुजबळांनी स्पष्ट केलं.

विधानसभेच्या बाहेर शिवसेना
आमदाराने घातले शीर्षासन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या त्या विधानाचा निषेध करण्यासाठी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यानंतर सभागृहाबाहेर येऊन शिवसेना आमदार घोषणाबाजी करु लागले. ‘राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव’च्या घोषणा शिवसेना आमदारांनी दिल्या. तसेच ‘राज्यपाल… राज्यपाल… खाली डोकं वर पाय,’ अशा घोषणाही यावेळी शिवसेना आमदारांनी दिल्या. राज्यपालांचा विरोध करण्यासाठी एका शिवसेना आमदाराने चक्क शीर्षासनही केलं.

18 वर्षाखालील व्यक्तींना आता
सिम कार्ड मिळणार नाही

मोबाईल ग्राहकांसाठी सिमकार्डबाबत नवा नियम तयार करण्यात आला. यामुळे आता १८ वर्षाखालील ग्राहकांना सिमकार्ड घेता येणार नाही. दुसरीकडे, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे ग्राहक त्यांच्या नवीन सिमसाठी आधार किंवा डिजीलॉकरमध्ये साठवलेल्या कोणत्याही दस्तऐवजासह स्वतःची पडताळणी करू शकतात. दूरसंचार विभागाने याबाबत आदेश जारी केला आहे. DoT ने हे पाऊल १५ सप्टेंबर २०२१ रोजी मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या दूरसंचार सुधारणांचा एक भाग आहे.

रशियाचा निषेध, विरोध करण्यासाठी
जगभरातील 141 देश एकत्र

नवी दिल्ली : युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धादरम्यान यूएनजीएने (UNJA) रशियाचा निषेध करणारा ठराव मंजूर केला आहे. रशियाच्या विरोधात 141 मते पडली तर समर्थनार्थ फक्त 5 मते पडली. त्याच वेळी, 35 देशांनी यात भाग घेतला नाही. रशियाने युक्रेनवर चढवलेल्या हल्ल्यात अनेक शहरं बेचिराख झाली आहे. शहरांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या युद्धात अनेकांनी आपला जीव गमावला आहे.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.