फडणवीसांचे विश्वासू पुन्हा अॅक्शनमध्ये; मुंबई पोलीस दलात क्रिएट केली नवी पोस्ट
मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा प्रकारचा शासन आदेश काढण्यात आला आहे. यापूर्वी मुंबईत विशेष पोलीस आयुक्त पदाची पोस्ट नव्हती. पण आता विशेष पोलीस आयुक्त पदाची पोस्ट तयार करण्यात आली आहे.
देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात भारती हे शहरातील सर्वात शक्तिशाली आयपीएस अधिकारी होते. त्यानंतर ते लॉ अँड ऑर्डरचे सह आयुक्त झाले. त्यानंतर त्यांना अॕडिशनल डीजीपी म्हणून बढती देऊन दहशतवादविरोधी पथकात हलवण्यात आलं होतं.
दिसत तसं नसतं! स्वप्निल-अनिता देणार जीव? ‘वाळवी’नं वाढवलं गुढ
मागच्या काही वर्षात सिनेवर्षात अनेक कलाकारांनी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री अनिता दाते डोक्याला बंदूक लावून आत्महत्या करताना समोर आलेत. पण हे प्रत्यक्ष नसून हा त्यांचा नवा सिनेमा आहे. ‘वाळवी’ हा शब्द ऐकताच आपल्याला आठवते ती, लाकूड पोखरणारी किड. एवढं नुकसान करणारी हीच वाळवी जर एखाद्या नात्याला लागली तर? अशीच नात्याला लागलेली वाळवी आपल्याला परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ सिनेमात पाहायला मिळणार आहे. सिनेमाचा थ्रिलर ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
वाळवी या सिनेमात अभिनेता स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे वेगळ्याच अंदाजात दिसत असून त्यांच्या व्यक्तिरेखा सिनेमाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढवणाऱ्या आहेत. ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम सिनेमा आहे.
देवेंद्र फडणवीसांची यशस्वी मध्यस्थी, वीज कर्मचारी संघटनांसोबतच्या बैठकीनंतर संप मागे
राज्यात विविध मागण्यांसाठी महावितरण कंपनीच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला होता. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपावर जाणारच, असा ठाम निर्धार संपकरी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महावितरण कर्मचारी यांच्या बैठकीत यशस्वी चर्चा झाली आहे. आंदोलनाबद्दल बैठकीत चर्चा झाली. तसेच संप मागे घेण्याबाबत तोडगा निघाला आहे. 32 संघटना या चर्चेत सहभागी झाल्या होत्या. सरकारी कंपन्यांचं खासगीकरण करणार नाही, असे सरकारकडून वीज संघटनांना आश्वासन देण्यात आले. संप मागे घेण्याबाबत निर्णय घेतोय, असे वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी जाहीर केलं.
सोनिया गांधीची प्रकृती अस्वस्थ; गंगाराम रुग्णालयात केलं दाखल
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांना बुधवारी (4 जानेवारी) गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी आणि सोनिया गांधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आई-मुलाच्या नात्यातील एक अनोख क्षण यावेळी पाहायला मिळाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांना नियमित तपासासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रियांका गांधी वाड्रा यावेळी सोनिया गांधीसोबत रुग्णालयात असल्याचं सांगितलं जात आहे. मंगळवारी सोनिया गांधींना अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उत्तर प्रदेशातील प्रवेश करणाऱ्या भारत जोडो यात्रेत 7 किलोमीटर पायी चालून दिल्लीला परतले होते.
उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची संपत्ती ईडीकडून जप्त
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या १०.२० कोटी रुपयांची मालमत्तेवर तात्पुरती जप्ती आणली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील ४२ गुंठे जमीन व त्यावर बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचा समावेश असून, त्याची किमत ७ कोटी ४६ लाख ४७ हजार असल्याचे समजते.पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अनिल दत्तात्रय परब, मेसर्स साई रिसॉर्ट, मेसर्स सी शंख रिसॉर्ट आणि इतरांविरुद्ध दापोलीतील न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) तपास सुरू केला आहे. पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ च्या कलमांचे उल्लंघन झाल्याने अनिल परब आणि इतरांविरुद्ध राज्य सरकारची फसवणूक आणि नुकसान केल्याबद्दल दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ईडीने सविस्तर परिपत्रकही जाहीर केले आहे.
जिंदालमधील ८३ कामगार संपर्कहीन असल्याची तक्रार
मुंढेगावच्या जिंदाल पॉलीफिल्म्स कारखान्यातील ८३ कामगारांशी संपर्क होत नसल्याची तक्रार कुटुंबिय करीत असून संबंधितांचा प्रशासनाने शोध घ्यावा, अशी मागणी बाळासाहेबांशी शिवसेना पक्षाच्या इगतपुरी गटाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. कारखान्यातील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाली आहे. कंपनी व्यवस्थापन जाणीवपूर्वक आकडेवारी लपवून ठेवत असल्याचा आरोपही या गटाने केला.पक्षाचे सहसंपर्कप्रमुख माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन निवेदन दिले. जिंदाल कंपनीतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाल्याचा संशय शिष्टमंडळाने व्यक्त केला. कारखान्यात तीन सत्रात काम चालते. एका सत्रात २२०० कामगार कामावर असतात. त्यातील चार हजार कामगार कारखान्याच्या आवारात राहतात.
माकडाने दोन महिन्याच्या बाळाला छप्परावरुन फेकलं; उपचारापूर्वीच बाळाचा मृत्यू!
उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यामधील तिंदवारी पोलीस स्थानकामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील छापर गावामध्ये माकडांची दहशत मागील बऱ्याच काळापासून आहे. मागील दोन महिन्यांपासून माकडांनी या गावामध्ये उच्छाद मांडला आहे. अशाच एका घटनेमध्ये माकडाने घराच्या अंगणात झोपलेल्या एका दोन महिन्याच्या बाळाला उचून पळ काढला.माकड या बाळाला घेऊन जात असल्याचं दिसताच घरातील सदस्यांनी आरडाओरड केला. यानंतर माकडाने घराच्या छप्परावरुन बाळाला खाली फेकलं. या घटनेमध्ये बाळाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर वनविभागाविरोधात गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी वनविभागाच्या लोकांनी या प्रश्नाकडे कानाडोळा केल्याने या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
ऋषभ पंतच्या उपचारांबाबत BCCI नं दिली महत्त्वाची माहिती
भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत रस्ता अपघातात बळी पडला. रुरकीजवळ कार अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. डेहराडूनमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र आता दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) मोठा निर्णय घेतला आहे. DDCA पंतला उपचारासाठी मुंबईला घेऊन जाणार आहे. त्याचवेळी त्याच्या लिगामेंटच्या दुखापतीवर उपचार केले जातील.डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा म्हणाले- क्रिकेटपटू ऋषभ पंतला पुढील उपचारांसाठी आज मुंबईला हलवण्यात येणार आहे. ३० डिसेंबर रोजी झालेल्या कार अपघातानंतर पंत यांच्यावर डेहराडूनमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
SD Social Media
9850 60 3590