आयुष्यात प्रचंड आशावादी असणं खूप गरजेचं आहे असं नेहमी म्हटलं जातं. आशावादी विचारसरणी तुम्हाला वाईट काळात चांगले काम करण्यास प्रवृत्त करते आणि तुम्ही तुमच्या भविष्यासाठी अधिक चांगले काम करू शकता. परंतु तज्ञांच्या मते अती आशावादी राहणे कधीकधी आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. यालाच ‘टॉक्सिक पॉझिटिव्हिटी’ असे म्हटले जाते. जीवनात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण आतून खूप दुखावतो आणि आपल्या आत हजारो भावनांचे वादळ चालू असते. अशावेळी लोक आशावादी राहण्याची सल्ला देतील या भीतीने अनेक जण जवळच्या लोकांशीही बोलत नाहीत.
बेस्टलाइफच्या रिपोर्टनुसार, अशावेळी गप्प राहिल्याने किंवा नकारात्मक भावनांकडे दुर्लक्ष केल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत सकारात्मकता तुमच्या आरोग्यासाठी विषारी ठरू शकते. कारण अशा काही परिस्थिती असतात ज्याबाबत प्रियजनांशी बोलूनच एखाद्या व्यक्तीला बरे वाटू शकते. अशा परिस्थतीत तुम्ही स्वत:ला टॉक्सिक पॉझिटिव्हिटीपासून कसे वाचवू शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
अशी टाळा टॉक्सिक पॉझिटिव्हिटी
आपल्या विचारांकडे लक्ष द्या
तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता वाटत असेल किंवा तुम्ही तणावाखाली असाल तर सर्वप्रथम आत्मनिरीक्षण करा. विचार करा की तुम्ही विनाकारण नकारात्मक विचार करत आहात का? अनेक वेळा आपण स्वतःला किंवा इतरांचे सांत्वन करण्यासाठी सकारात्मक विचार करू लागतो. त्यामुळे अनेक वेळा सकारात्मक विचार विषारी बनतात आणि आपण आपल्या भावनांना आतून दाबू लागतो असे करू नका.
टॉक्सिक पॉझिटिव्हिटी ओळखा
बर्याच वेळा मित्र आणि कुटुंबातील सदस्य वाईट काळात तुम्हाला सकारात्मक वाटण्यासाठी खूप आशावादी गोष्टी बोलू लागतात. पण अशा गोष्टींमुळे तुम्हाला अपराधी आणि लाजीरवाणे वाटू लागते. त्यांच्या विश्वासाचा तुमच्या अंतरमनावर वाईट परिणाम तर होत नाही ना हे नेहमी लक्षात ठेवा. अशा लोकांशी तुम्ही या विषयांवर अजिबात बोलू नका.
स्वतःच्या भावना सामान्य समजा
प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतात आणि प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांना सामोरे जातो. परंतु जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या समस्या आणि नकारात्मक भावना स्वीकारत नसाल तर ते तुमचे आणखी नुकसान करू शकते. त्यामुळे अशा भावनांची लाज वाटण्यापेक्षा त्यांना सामान्य मानून स्वीकारणेच योग्य ठरेल.
सोशल मीडियापासून ब्रेक घ्या
तुम्ही कठीण परिस्थितीत असाल तर सोशल मीडियापासून ब्रेक घ्या. असे केल्याने तुम्ही टॉक्सिक पॉझिटिव्हीटी बर्याच प्रमाणात टाळू शकता. सोशल मीडियावर अशा मित्रांना किंवा अकाउंटना ब्लॉक किंवा अनफॉलो करा ज्यामुळे सकारात्मकतेच्या नावाखाली तुमच्यावर जास्त ताण पडतो. तुम्ही स्वतःला टॉक्सिक पॉझिटिव्हिटीपासून दूर ठेवले तर तुमचे नातेही सुधारेल आणि तुम्ही तुमचे आयुष्य चांगल्या पद्धतीने हाताळू शकाल.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. Sdnewsonline यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)