रस्त्यावरुन जाणाऱ्या असंख्य बाईक्समध्ये काही कंपन्यांच्या बाईक्स नजरा वळवून वाटसरुंची मनं जिंकतात. royal enfield च्या बाईक्स त्यापैकीच एक. एनफिल्डच्या बाईकबाबत बोलताना, मेटल मशीन असा उल्लेख अनेक बाईकप्रेमींकडून केला जातो. अशाच एनफिल्ड प्रेमींसाठी आता ही कंपनी भारतीय बाजारात क्लासिक 350 ही बाईक आणत आहे.
(royal enfield classic 350) रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 ही बाईक ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस भारतीय बाजारात लाँच केली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या नव्या मॉडेलच्या अनावरणापूर्वीच त्याच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. टेक्नॉलॉजी आणि एक्सटेरियर लूकच्या बाबतीच ही बाईक सर्वांचीच दाद मिळवत आहे.
काही दिवसांतच लाँच होणाऱ्या या बाईकमध्ये 349 सीसी सिंगल सिलेंडर, DOHC इंजिन असेल. आधुनिक इंजिनाशिवाय या बाईकमध्ये अपडेटेड क्लासिक 350 ट्रीपर टर्न बाय टर्न नेव्हिगेशनचा वापर करण्यात येईल. जे सर्वप्रथम मीटियर 350 मध्ये पाहिलं गेलं होतं.
बाईकचं हे नवं मॉडेल सध्याच्या आणि हल्लीच महाग झालेल्या क्लासिक 350 ची जागा घेणार आहे. नव्यानं सुरु करण्यात आलेल्या किंमतीनुसार क्लासिक 350 टॉप-ऑफ-द-लाइन पेंट स्कीमसाठी तुम्हाला 1,79,782 लाख रुपये (एक्स-शोरूम, अहमदाबाद) पासून 2,06,962 लाख रुपये (एक्स-शोरूम, अहमदाबाद) इतकी किंमत मोजावी लागू शकते. परिणामी नव्या क्लासिकची किंमत 1.85 लाखांपासून सुरु होईल असं म्हटलं जात आहे. गेल्या काही काळापासून निरीक्षण केल्यास अनेक जुन्या मॉडेल्सना नवा टच देत बाजारात ते नव्या अंदाजात सादर करण्य़ाला एनफिल्डकडून प्राधान्य देण्यात येत आहे. याचंच एक उदाहरण म्हणजे हल्लीच लाँच करण्यात आलेली हिमालयन.
(फोटो क्रेडिट गुगल)