आज दि.१ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

सप्टेंबर महिन्यात दोन महिन्यांच्या
थकबाकीसह डीए देणार

शिव गोपाल मिश्रा म्हणाले, “सरकार सप्टेंबर महिन्यात दोन महिन्यांच्या थकबाकीसह डीए देणार आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पगारात महागाई भत्ता (डीए) आणि डीआर देण्यास सरकारने सहमती दर्शविली आहे. सरकार केंद्रीय हफ्ते आणि निवृत्तीवेतनधारकांना तीन हफ्त्यांचे डीए आणि डीआर देईल. हे तीन हफ्ते जानेवारी २०२०, जुलै २०२० आणि जानेवारी २०२१ मधील असतील. मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै आणि ऑगस्ट २०२१ साठी थकबाकीही देण्यात येणार असून, सप्टेंबरमध्ये ही रक्कम कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. केंद्रीय सचिवांनी अशी हमी दिली असल्याचं मिश्रा म्हणाले.

कच्च्या पाम तेलाचे आयात
शुल्क १० टक्के करण्याची घोषणा

खाद्यतेलांच्या दरात सातत्याने वाढ होत होती. चांगल्या मोहरी आणि रिफाइंड तेलाच्या किंमतींनी प्रतिलिटर २०० रुपयांचा आकडा गाठला आहे. सामान्य तेलाच्या किंमतीही १७० आणि १८० रुपयांपेक्षा कमी नाहीत. दिलासादायक बाब म्हणजे केंद्र सरकारने तेलांच्या किंमती कमी करण्याची तयारी दर्शवली आहे. सरकारने कच्च्या पाम तेलाच्या आयात शुल्क १० टक्के करण्याची घोषणा केली आहे.

राज्यांना अधिक चांगल्या
नियोजनाची गरज : हर्ष वर्धन

२१ जूनपासून केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना केंद्राकडून मोफत लसीकरण केलं जाईल, अशी घोषणा केली. लस खरेदी करून ती राज्यांना पुरवण्याची जबाबदारी पुन्हा केंद्रानं स्वत:कडे घेतली असून राज्यांनी लसीकरण मोहीम राबवायची आहे. मात्र, त्यानंतर देशाच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर लस तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याची वेळ ओढवली आहे. राज्यांमध्ये समस्या असेल, तर याचा अर्थ राज्यांना अधिक चांगल्या नियोजनाची गरज आहे”, असं हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे.

पेट्रोलचे भाव आणखी भडकणार ?

अमेरिकेतल्या इंधनसाठ्यात सलग सहाव्या आठवड्यात घट झाल्यानंतर इंधनाचे मासिक आणि तिमाही भाव वाढले आहेत. OPEC या संघटनेच्या सांगण्यानुसार वर्षाच्या उर्वरीत महिन्यांमध्येही इंधनपुरवठा कमी करण्याचे सूतोवाच आहे. त्यानुसार इंधनाचे दर एका बॅरलमागे ०.५ टक्क्यांनी वाढून ७५.१३ डॉलर्सवर थांबले. सप्टेंबरचे करारही ३४ सेंट्सनी वाढल्याने हा भाव आता प्रति बॅरल ७४.६२ डॉलर्सवर स्थिरावला आहे. अमेरिकेतील वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटच्या तेलाचा भाव प्रति बॅरल ४९ सेंट्सनं किंवा ०.७ टक्क्यांनी वाढून ७३.४७ डॉलर्स इतका झाला आहे. गेल्या सात महिन्यांत इंधनाच्या दरांत सलग वाढ झालेली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी मानले
डॉक्टरांचे आभार

अ‍ॅलोपॅथीवर योगगुरु रामदेव बाबा आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातील वाद मिटला नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी डॉक्टरांना अभ्यासाद्वारे योगास जागतिक व्यासपीठावर नेण्याचे आवाहन केले. आयएमएतर्फे आयोजित व्हर्च्युअल कार्यक्रमात डॉक्टर दिनानिमित्त संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी कोविड -१९ च्या आजारात डॉक्टरांचे अथक सेवा केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

चीनविरोधात दादागिरी करणाऱ्या
शक्तींचं डोकं ठेचू

चीनविरोधात दादागिरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विदेशी शक्तींचं डोकं ठेचू अशा शब्दांमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अन्य राष्ट्रांना इशारा दिला आहे. चीनच्या जनतेनं नवं विश्व उभं केलं आहे असं सांगत त्यांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या शताब्दीनिमित्त देशाला संबोधित केलं.

माझ्यावर हल्ला करून साहेब
पंतप्रधान कसे होणार

पडळकरांनी गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका केल्यामुळेच गाडीवर दगड फेकण्यात आल्याचा दावा केला जात आहे. पडळकरांनी नेमकं काय झालं? याचा व्हिडीओ शेअर केला आहे. गोपीचंद पडळकर म्हणतात, “प्रस्थापितांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला आहे. अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नाही. माझ्यावर हल्ला करून जर तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील, तर हा तुमचा गोड गैरसमज आहे”, असं ट्वीट गोपीचंद पडळकर यांनी व्हिडीओसोबत केलं आहे.

समाजवादी पक्षाचे संस्थापक
मुलायमसिंह यादव रुग्णालयात दाखल

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत रुग्णालयाकडून अद्याप कोणतेही माहिती देण्यात आली नाही. ८१ वर्षीय मुलायमसिंह यादव यांच्यावर वृद्धापकाळामुळे आलेल्या अरोग्याचा समस्येवर उपचार केले जात आहेत.

मार्केझची जगातील सर्वात
वयस्कर व्यक्ती म्हणून नोंद

प्यूर्टो रिको येथे राहणाऱ्या व्यक्तीची जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे. एमिलियो फ्लोर्स मार्केझ असं त्यांच नाव आहे. सध्या त्यांच वय ११२ वर्ष ३२६ दिवस आहे. जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने याची घोषणा केली. मार्केझचा जन्म १९०८ मध्ये पोप्यूर्टो रिकान राजधानी कॅरोलिना येथे झाला होता.

पुणे ठरलं राज्यातलं सर्वाधिक
भौगिलिक क्षैत्रफळ असलेलं शहर

पुणे आता अधिकृतपणे राज्यातलं सर्वाधिक भौगिलिक क्षैत्रफळ असलेलं शहर ठरलं आहे. राज्य सरकारने काल पुणे महानगरपालिकेच्या हद्दवाढीटा अध्यादेश काढला आणि २३ गावांचा पुणे मनपाच्या हद्दीत समावेश करण्यात आला. पुण्याने भौगोलिक क्षेत्रफळाच्या बाबतीत आता मुंबईलाही मागे टाकलं आहे.

गाझीपूर आंदोलन भारतीय किसान
युनियनच्या २०० कार्यकर्त्यांवर कारवाई

दिल्ली व उत्तर प्रदेशच्या सीमेवर गाझीपूर येथे भाजपचे कार्यकर्ते आणि कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करत असलेल्या आंदोलकांमध्ये हाणामारी झाली. ज्यामध्ये दोन्ही बाजूचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले. याप्रकरणी आता पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली असून, भारतीय किसान युनियनच्या २०० कार्यकर्त्यांवर एफआयआर नोंदवला गेला आहे.

श्रीलंका दौऱ्यात भारत ३ एकदिवसीय,
३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार

भारताचा एक संघ इंग्लंड दौऱ्यावर असून त्याचं नेतृत्व विराट कोहली करत आहे. तर दुसरा संघ श्रीलंका दौऱ्यावर असून त्याचं नेतृत्व शिखर धवन करत आहे.
श्रीलंका दौऱ्यात भारत एकूण ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. १३ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. हे सामने २५ जुलैपर्यंत असणार आहेत. या संघात देवदत्त पडिक्कल, मनिष पांडे, नितीश राणा, पृथ्वी शॉ, ऋतुराज गायवाड, शिखर धवन, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कृष्णप्पा गॉथम, कृणाल पंड्या, इशान किशन, संजू सॅमसन, भुवनेश्वर कुमार, चेतन साकरिया, दीपक चहर, कुलदीप यादव, नवदीप सैनी, राहुल चहर, वरुण चक्रवर्थी, यजुवेंद्र चहल यांचा समावेश आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.