ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना न्यूमोनियाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नसीरुद्दीन शाहंच्या व्यवस्थापकाने ही माहिती दिली आहे. तसेच, अभिनेत्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे देखील त्याने सांगितले. नसीरुद्दीन यांच्यासोबत पत्नी रत्ना पाठक आणि त्यांची मुले देखील रुग्णालयात उपस्थित आहेत
एका वेबसाइटशी बोलताना नसीरुद्दीन यांचे मॅनेजर म्हणाले की, ‘त्यांना 2 दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. न्यूमोनियामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. अभिनेताच्या फुफ्फुसात हा पॅच दिसल्याने डॉक्टरांनी त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. त्यांची प्रकृती आता स्थिर असून, सुधारत आहे.’
गेल्या वर्षीही नसीरुद्दीन शाह यांची तब्येत बिघडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, पण त्यानंतर त्यांच्या मुलाने हे अहवाल चुकीचे असल्याचे सांगितले होते. इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर या चर्चा खूप व्हायरल झाल्या होती. यानंतर त्यांचा मुलगा विवान याने ट्विट केले होते की, ‘सर्व काही ठीक आहे. त्यांच्या तब्येतीबद्दल ज्या काही बातमी येत आहेत, त्या एकदम चुकीच्या आहेत. ते एकदम ठीक आहेत.
नसीरुद्दीन शाह हे त्याच्या पिढीतील सर्वात हुशार अभिनेते मानले जातात. एवढेच नाही तर, ते अजूनही चित्रपट विश्वात सक्रिय असून, मोठ्या स्टार्सना तगडी स्पर्धा देतात. मनोरंजन विश्वातील त्यांच्या योगदानाबद्दल नसीरुद्दीन शाह यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सन 2020मध्ये ते ‘बंदिश बॅन्डिट्स’मध्ये झळकले होते. त्याशिवाय नसीरुद्दीन या वर्षाच्या सुरुवातीला ‘रामप्रसाद की तेरहवी’ या चित्रपटात देखील काम केले होते.