येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे रिमांड होम मधील विद्यार्थीनींना एक दिवसीय राखी बनवा मोफत कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. भैरवी गुजराथी यांनी मुलींना प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले. डॉ. वैजयंती पाध्ये यांनी त्यांना सहकार्य केले.
मुलींमधील कौशल्य विकसित करुन त्यांना आत्मनिर्भर करणाऱ्या या कार्यशाळेस रोटरी सेंट्रलच्या तृप्ती पारेख, साधना दामले, डॉ. विद्या चौधरी, नीता जैन, मनिषा पाटील व अधीक्षक जयश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
रोटरी सेंट्रलच्या मिटींगमध्ये सी.ए.जयेश दोशी यांच्या हस्ते व अध्यक्ष विपुल पारेख, मानद सचिव रविंद्र वाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत विनामूल्य प्रशिक्षण देणाऱ्या भैरवी गुजराथी व प्रोजेक्ट चेअरमन डॉ. विद्या चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.