सापाने चावा घेतल्याचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की अगदी 10 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये कोब्राने कसा वावा सुरेशला दंश केला.सुरेश वाव यांनी साप चावण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी आतापर्यंत 50 हजारांहून अधिक सापांची सुटका केली आहे. यादरम्यान त्यांना आतापर्यंत 250 हून अधिक सापांनी चावा घेतला, परंतु प्रत्येक वेळी सर्पमित्राने मृत्यूला परतवून लावलं आहे. त्यामुळे यावेळी देखील तो मृत्यूसमोर हार माननार नाही गेल्या 20 वर्षांपासून ते विविध प्रकारचे साप हाताळत असून बचाव केल्यानंतर त्यांना जंगलात सोडतात.
त्याच्या इंस्टाग्रामवर त्याचे साप, अजगर असे फोटो आहेत. या फोटोंमध्ये तो सापासोबत खूपच कम्फर्टेबल दिसत आहे. जणू त्याच्या हातात साप नाही तर दोरीच आहे. विषारी साप हाताळण्यात त्याची प्रवीणता पाहून त्याला केरळ वनविभागाने नोकरीची ऑफरही दिली होती पण त्याने ती नाकारली.
केरळ सरकारने दिलेली नोकरीची ऑफर नाकारत, ते म्हणाले की, ‘त्यांनी ही नोकरी स्वीकारली असती तर समाजाला नैसर्गिक पद्धतीने मदत करता आली नसती.’
सहावीत असतानाच त्यांची सापांशी मैत्री झाली. गेल्या अनेक वर्षांपासून तो या व्यवसायात सक्रिय आहेत. 2018 मध्ये केरळमध्ये आलेल्या पुरात त्यांने एका आठवड्यात 9 जिल्ह्यातून 80 सापांची सुटका केली होती.
एका मुलाखतीत वावा सुरेशने सांगितले होते की, सापाचे विष गोळा करतो असे अनेक आरोप करत, त्याला बदनाम करण्यात आले. या सर्व आरोपांमुळे तो खूप दुखावला गेला होता आणि त्याच्यावर मानसिक तणावही होता.
‘शेवटच्या श्वासापर्यंत सापांना वाचवायचे होते’
वावा सुरेशने एका मुलाखतीत सांगितले होते, ‘मला शेवटच्या श्वासापर्यंत सापांना वाचवायचे होते. आजपर्यंत मी कोणाकडे पैसे मागितले नाही. मला कोणी पैसे दिले तर मी घेईन. सापांना वाचवणे आणि त्यांना जंगलात नेणे ही एक खर्चिक प्रक्रिया आहे पण मी कोणाला या खर्चाबद्दल सांगितले नाही