नाणी, खिळे, पिन, छोटी लोखंडी वस्तू अशा वस्तू पोटातून काढल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. आता या वस्तू लहान ज्या तोंडात टाकल्यास गिळल्यानंतर पोटात जातील. पण एका व्यक्तीच्या पोटात तर चक्क ग्लास गेला आहे. त्याच्या पोटातून मोठा स्टिलचा ग्लास बाहेर काढण्यात आला. जे पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. आता हा ग्लास शरीराच्या आत गेला तरी कसा हा सर्वात मोठा प्रश्न.
उत्तर प्रदेशच्या महराजगंज जिल्ह्यातील गोठवा भटौलीतील एका रुग्णाचं कुटुंब त्याला घेऊन रुग्णालयात गेलं. आपल्या पोटात खूप वेदना होत आहेत, आपल्याला भूक लागत नाही. असं त्याने डॉक्टरांना सांगितलं. रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाला हर्निया असल्याचं सांगितलं. आपला रुग्ण गेले तीन-चार दिवस वारंवार टॉयलेटला जातो आहे. पण तरी तो काहीच खात नाही. अशी माहिती रुग्णाच्या कुटुंबाने नातेवाईकांना दिली.
डॉक्टरांनी रुग्णाच्या वैद्यकीय तपासण्या केल्या. सुरुवातीला त्याचं अल्ट्रासाऊंड केलं पण त्यात काही स्पष्ट दिसलं नाही. त्यानंतर एक्स-रे करण्यात आला. तेव्हा जे दिसलं ते पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. त्याच्या पोटात काहीतरी वस्तू असल्याचं दिसलं. त्याचं तात्काळ ऑपरेशन कऱण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्जरी केली तेव्हा डॉक्टर शॉक झाले. कारण त्याच्या पोटातून चक्क एक ग्लास निघाला. हा स्टिलचा ग्लास होता. ज्याचा आकार 4 इंच लांब आणि अडीच इंच रू्ंद होता.
या रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर सिद्धार्थ यांनी सांगितलं की, अशा पद्धतीचं हे तिसरं ऑपरेशन मी केलं आहे. याआधी एका प्रकरणात मी पोटातून बाटलीही काढली आहे. हे ऑपरेशन माझ्या 18 वर्षांच्या करिअरमधील आश्चर्यकारक ऑपरेशन होतं, जे मी दोन तासांत केलं. गुद्द्वारातून हा ग्लास आत गेल्याची माहिती आहे.
आता रुग्णाला आयसीयूत ठेवण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.