बॉम्बस्फोट घडवण्याच्या मोठा कट उघड, महाराष्ट्रातून जान मोहम्मद शेखला अटक

दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने बॉम्बस्फोट घडवण्याच्या मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी एकूण सहा संशय़ित दहशतवाद्यांना अटक केलं असून त्यांची उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना होती. अटक केलेल्या संशयितांमध्ये मुंबईत राहणाऱ्या एकाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याचे नाव समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख असून त्याला राजास्थानच्या कोटामधून अटक करण्यात आलंय. तो सायन वेस्टमधल्या एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता.

संशयित दहशतवाद्याचे सायन परिसरात वास्तव्य
देशात सध्या सणांची धूम आहे. या पार्श्वभमीवर देशात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. हा कट दिल्ली पोलीस तसेच एटीसने उधळून लावला. पोलिसांनी एकूण सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केलं आहे. अटक केलेल्यांपैकी एक जण मुंबईतील सायन परीसरात वास्तव्यास होता. जान मोहम्मद शेख असे त्याचे नाव आहे. त्याला दिल्ली पोलिसांनी राजस्थानच्या कोटामधून अटक केलीय. शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जात होता. समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख हा दाऊदचा भाऊ अनिस याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे.

दहशतवादी हल्ल्याचा कट उघट झाल्यानंतर यामध्ये मुंबईतील जान मोहम्मद शेख सामील असल्याचे समोर आले. ही बाब समजताच सायन परिसरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस जान शेखच्या घरी पोहोचले. तसेच पोलिसांनी घराची तपासणी करुन त्याच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले. सध्या जान शेखचे कुटुंबीय धारावी पोलीस ठाण्यात असून त्यांची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे धारावी पोलीस ठाण्यासमोर लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

दिल्ली पोलिसांनी एकूण सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केलं आहे. हे संशयित ISI च्या देखरेखीखाली भारतात मोठा बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते. त्यासाठी अटक केलेले आरोपी शस्त्रास्त्रे तसेच दारुगोळा जमवत होते. मात्र, या घातपातची माहिती दिल्ली पोलीस विशेष कक्षाला तसेच एटीएसला समजली. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या एटीएससोबत उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये छापेमारी केली. तसेच येथे तीन संशयित आरोपींना पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दारुगोळा तसेच शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.