या सोप्या पद्धतीने ओळखा खवा असली आहे की नकली, होणार नाही तुमची फसवणूक

दिवाळीसारख्या सणासुदीचा काळात लोक मिठाई खरेदी करतात. या काळात खवा किंवा खव्याच्या पदार्थांना मोठी मागणी असते. त्यामुळे खव्याध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असते. अशा परिस्थितीत आवडीचे खाद्यपदार्थ खरेदी करण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी काळजी घेण्याची खूप गरज आहे. खवा भेसळयुक्त आहे की, नाही हे आपण कसे ओळखू शकतो याची माहिती घेऊया.

खवा खरेदी करताना काळजी घ्या

खवा हा मिठाई पदार्थ बनवण्याचा मुख्य घटक आहे. मात्र, त्याच्या गुणवत्तेबाबत नेहमीच प्रश्न निर्माण केला जातो. काही लोक मिठाई बनवण्यासाठी सिंथेटिक खवा वापरतात. अशा परिस्थितीत भेसळयुक्त आणि खराब झालेला खवा मिठाई खाण्यापेक्षा अनेकजण घरी मिठाई बनवतात. पण जर तुम्ही मिठाई बनवण्यासाठी बाजारातून खवा विकत घेत असाल, तर तुम्ही खूप सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण भेसळयुक्त खवा किंवा मिठाई तुमच्या आरोग्याला हानीकारक ठरू शकते.

खवा किंवा मिठाई खरेदी करण्यापूर्वी तुम्ही त्याची शुद्धता सहज तपासू शकता. शुद्ध आणि ताज्या खव्याचा पोत तेलकट आणि दाणेदार असतो. तुम्ही थोडासा खवा घ्या आणि तळहातावर घासलात आणि त्यात दाणेदार पोत असेल आणि त्यात तेलाचे काही अंश निघत असतील आणि थोडी गोड चव येत असेल तर तो शुद्ध खवा आहे, तसे नसेल तर त्यात भेसळ आहे. खवा घासल्यानंतर त्याची चव थोडी गोड होते आणि तो तेल सोडू लागतो. खव्याची शुद्धता ओळखण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.

गरम पाणी आणि आयोडीन यांचे मिश्रण करून चाचणी

अन्न मानक आणि सुरक्षा प्राधिकरण (FSSAI) नुसार, खव्याची गुणवत्ता तपासण्यासाठी, एक चमचा खवा घ्या आणि तो एक कप गरम पाण्यात मिसळा. आता कपमध्ये आयोडीनचे काही थेंब टाका. त्यात आयोडीन टाकल्याने खवा निळा झाला तर त्यात स्टार्चची भेसळ झाली आहे. जर नसेल तर तो खवा शुद्ध आणि वापरण्यास योग्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.