शिंदे – फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होणार असून या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची चर्चा जोर धरत आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्याला आणखी 2 मंत्रिपद मिळणार आहेत अशी चर्चा रंगली आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइक करता सुरुवातीपासून ठाण्यातील आमदारांनी साथ दिली होती. यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात ठाणे जिल्ह्यातून कोणाची वर्णी लागणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.
महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केली. या करता ठाणे जिल्ह्यातील सर्व भाजप आणि शिवसेना आमदारांनी खुप मेहनत घेतली. यामुळे ठाणे जिल्ह्याला मुख्यमंत्रिपद तर मिळालेच तर भाजपने देखील आमदार रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रिपद बहाल केले. तर आता नवीन मंत्रिमंडळात आणखी दोन कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चित झालंय.
उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी फारकत घेवून भाजपाशी जवळीक करावी हे एक वर्ष आधी सांगणारे आमदार प्रताप सरनाईकांना तर कल्याण मतदार संघातील मर्जीतील आमदार बालाजी किणीकर या दोघांची कॅबिनेट मंत्री पदाकरता वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तर किमान १ राज्यमंत्रिपद आणि महामंडळ देखील बाळासाहेबांची शिवसेना गटाला ठाण्यात दिले जाणार हे जवळपास निश्चित झालंय.
दुसरीकडे भाजपा आपल्या वाट्याला आलेले २ महामंडळ पदे देखील ठाणे जिल्ह्यात देणार हे ही ठरलंय. यामुळे मंत्रि मंडळात ठाणे जिल्ह्याचा वर चष्मा असणार यात काही शंका नाही.
एकीकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील पण ठाणे जिल्ह्यातील दोन आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल अशी चर्चा असतानाच दुसरीकडे पक्षातील नाराजी दूर करण्याकरता एक कॅबिनेट मंत्रिपद दुसऱ्या जिल्ह्याला देवून राज्यमंत्रिपद स्वीकारणाऱ्या आमदाराला ठाणे जिल्हा पालकमंत्री पदाची लॉटरी देवून पक्षातील नाराजी थंड करण्याचा मास्टर स्ट्रोक बाळासाहेबांची शिवसेना खेळणार असल्याची चर्चा आहे.
शिंदे-फडणवीस सरकार सत्ते आलंय. नव्या मंत्रिमंडळ विस्तारात १८ कॅबिनेट मंत्रिपदे दिली जाणार तर राज्यमंत्री आणि महामंडळ देखील दिली जाणार आहे. कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदं ठाणे जिल्ह्यातील आमदारांना जास्तीचे मिळणारच आहेत तर आता महामंडळ मिळाले याकरता भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील आमदार देखील फिल्डिंग लावत आहेत, ही पदे कोणाला मिळतील हे लवकरच स्पष्ट होईल.