अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. या संपूर्ण वादावर उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरुन गेल्या अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू होती. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला होता. अखेर या प्रकरणी निवडणूक आयोगाची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सलग चार तास बैठक झाली. या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे.
बाळासाहेबांच्या खांद्यावर हात ठेवून उद्धव ठाकरे उभे आहेत. ‘जिंकून दाखवणारच’ असं कॅप्शन या फोटोला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे.तर शिवसेनेला आता नाव वापरता येणार आहे पण चिन्ह वापरता येणार नाही. याबद्दल मिलिंद नार्वेकर यांनी सूचक ट्वीट केलं आहे.
नार्वेकर यांनी वाघाचा फोटो शेअर केला आहे. त्यावर आमचे चिन्ह श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख आहे. त्यामुळे शिवसेना गटाचं चिन्ह वाघ असणार आहे, का अशी चर्चा रंगली आहे. तसंच शिवसेनेच्या नावापुढे शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे) असा उल्लेख असणार आहे का, असे संकेतही त्यांनी दिले.
तर, निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे पक्षांना धनुष्यबाणाऐवजी मुक्त चिन्हांपैकी एखादे चिन्ह घेता येईल. शिवसेना नाव वापरता येईल परंतु, त्याला काही जोडावे लागेल, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिली.
तसंच, शिवसेना नावासमोर आता दुसरे एखादे सुटसुटीत नाव जोडावे लागणार आहे. धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय हा तात्पुरता आहे. चिन्हाबाबत अंतिम निवाडा होईपर्यंत हा निर्णय लागू हे आयोगानं म्हटलं आहे. अंतिम निवाडा कधी ते पुढील काळात ठरणार आहे, असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सध्याच्या घडीला 197 फ्री निवडणूक चिन्ह आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला यापैकी तीन चिन्हाचा पर्याय दिला जावू शकतो. आता दोन्ही गट कोणते चिन्ह घेतात हे सोमवारी समोर येणार आहे. दोन्ही त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश :
1) दोन गटांपैकी कोणीही शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही.
२) दोन्ही गटांपैकी कोणालाही “धनुष्य आणि बाण” हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
3) दोन्ही गट त्यांच्यासाठी निवडतील अशा नावांनी ओळखले जातील. संबंधित गट, त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात.
4) दोन्ही गटांना ते निवडतील अशी वेगवेगळी चिन्हे देखील दिली जातील. यासाठी निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवड करावी लागेल. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
(i) त्यांच्या गटांची नावे ज्याद्वारे त्यांना आयोगाने मान्यता दिली असेल आणि
यासाठी, प्राधान्य क्रमाने तीन पर्याय द्या, त्यापैकी कोणीही असू शकतो
आयोगाने मंजूर केलेले आणि;
(ii) उमेदवारांना जे चिन्ह वाटप केले जाऊ शकतात, जर असतील तर
संबंधित गट. ते मध्ये तीन मुक्त चिन्हांची नावे सूचित करू शकतात.
त्यांच्या पसंतीचा क्रम, त्यापैकी कोणालाही त्यांच्या उमेदवारांना वाटप केले जाऊ शकते.