आगीपासून बचावासाठी ठेवा लक्षात ‘या’ गोष्टी, टळू शकेल जीवितहानी

संकटं किंवा अपघात कधीही कोणाचाही घात करू शकतात. त्यामुळे आपण सतर्क राहाणे आवश्यक आहे. त्यातही अग्निसुरक्षेच्या बाबतीत जागरूकता खूप जास्त महत्वाची आहे. प्रत्येकाने आगीपासून वाचण्याचे काही सोपे मार्ग लक्षात ठेवले तर बहुतेक आगीचे अपघात टाळता येऊ शकतात. आगीचा कहर रोखण्यासाठी आणि आगीपासून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी आग प्रतिबंधक दिवस साजरा केला जातो.

युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि इतर काही देशांमध्ये दरवर्षी 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या काळात कोणत्याही दिवशी आग प्रतिबंधक दिवस म्हणजेच फायर प्रिव्हेन्शन डे साजरा केला जातो. येथे नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशन (NFPA) अग्निसुरक्षा आणि प्रतिबंध याविषयी जागरुकता वाढवण्यासाठी अग्नि प्रतिबंध सप्ताहाची मोहीम आयोजित करते.

आगीपासून बचावासाठी काही महत्वाच्या गोष्टी

– अग्निसुरक्षेसाठी काही पद्धतींचा अवलंब करून आपण जीवित आणि वित्तहानी टाळू शकतो. सर्व ठिकाणी फायर अलार्म लावले पाहिजेत, जे आग लागताच वाजायला लागतात आणि त्यामुळे सर्व लोकांना सतर्क केले पाहिजे.

– आग लागल्यास आगीतून ज्वलनशील पदार्थ ताबडतोब काढून टाकावेत, अन्यथा आग पसरून नुकसान अधिक होऊ शकते. ऑक्सिजनचा पुरवठा बंद करूनही आग थांबवता येते.

– आग लागताच पाण्याने विझवली पाहिजे, परंतु त्यापूर्वी अग्निशामक यंत्रणेला माहिती द्यावी. पेट्रोल आणि डिझेलमुळे लागलेली आग वाळूने विझवता येते.

– तुमच्या कपड्यांना आग लागली तर धावू नका. कारण त्यामुळे आग वाढेल. अशा परिस्थितीत जमिनीवर झोपा आणि जमिनीवर उलट सुलट ह्योऊन आग विझविण्याचा प्रयत्न करा.

– घरात आग लागल्यावर अंगावर ब्लँकेट घेऊन घराबाहेर पडा.

– सर्वांनी आगीबाबत सावध राहून इतरांनाही सावध केले पाहिजे. त्यामुळे आपल्यासह इतरांचेही प्राण वाचू शकतात आणि इतर नुकसानही टाळले जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.