महाराष्ट्र, कर्नाटक सीमावादावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या देशात प्रांतवाद टोकाला गेला आहे. दोन्ही राज्यांमध्ये एकाच पक्षाची सत्ता आहे. मात्र तरीही दोन्ही मुख्यमंत्री वेगवेगळी भूमिका मांडत आहेत. अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तर आपली भूमिकाच स्पष्ट केलेली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले कर्नाटकमध्ये जाणार नाही. म्हणजे या देशांमध्ये एकमेकांच्या राज्यात जाण्यास बंदी आहे का? अशा प्रकारचं वक्तव्य करण देशद्रोह नाही का? असे अनेक सवाल यावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केले आहेत.
नेमकं काय म्हणाले खडसे?
एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा सीमावादावरून एकनाथ शिंदे आणि भाजपावर निशाणा साधला आहे. या देशात प्रांतवाद टोकाला गेला आहे. दोन्ही राज्यांमध्ये एकाच पक्षाची सत्ता आहे. मात्र तरीही दोन्ही मुख्यमंत्री वेगवेगळी भूमिका मांडत आहे. अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तर आपली भूमिकाच स्पष्ट केलेली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले कर्नाटकमध्ये जाणार नाही. म्हणजे या देशांमध्ये एकमेकांच्या राज्यात जाण्यास बंदी आहे का? अशा प्रकारचं वक्तव्य करण देशद्रोह नाही का? असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.