‘द काश्मीर फाइल्स’ची ऑस्कर २०२३ मध्ये एंट्री

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांचा चाहता वर्ग मोठा आहे. अनुपम खेर गेली अनेकवर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. आपल्या करियरमध्ये त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाइल्स चित्रपटात त्यांनी काम केले होते. याच चित्रपटाने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हा चित्रपट ऑस्कर २०२३ साठी शॉर्टलिस्ट झाला आहे.

अनुपम खेर सोशल मीडियावर सक्रीय असतात, नुकतीच त्यांनी या चित्रपटाच्याबाबतीत पोस्ट शेअर केली आहे. ऑस्करमध्ये चित्रपट शॉर्टलिस्ट झाल्यावर त्यांनी या चित्रपटातील आपल्या भूमिकेचा फोटो शेअर केला आहे. “अत्यंत नम्रणपणे याकडे बघतो की ‘द काश्मीर फाईल’ चित्रपट आणि माझे नाव असे दोन्ही ऑस्करमध्ये उत्कृष्ट चित्रपट आणि उत्कृष्ट अभिनेता असे शॉर्टलिस्ट झाले आहे. ऑस्करमध्ये शॉर्टलिस्ट होणे हे खूप मोठी गोष्ट आहे. इतर भारतीय चित्रपटांचे अभिनंदन, भारतीय चित्रपटांचा विजय असो,” अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, ‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटावरून बराच वाद झाला होता. हा प्रोपगंडा चित्रपट असल्याची टीकाही झाली होती.

अनुपम खेर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या बहुचर्चित ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटात झळकणार आहेत. हा विषय करोना काळातील लसीकरणाच्या मोहिमेसंदर्भात असल्याने या विषयाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२३ रोजी दर्शकांच्या भेटीला सज्ज झाला असून, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली यासह १० हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच, या चित्रपटाची निर्मिती पल्लवी जोशी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.