आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात ऑनलाईन बैठक होत आहे.
दोन्ही नेते विद्यमान द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतील.
दक्षिण आशिया, इंडो-पॅसिफिक आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्द्यांवर अलीकडील घडामोडींवर विचार विनिमय करतील.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या निवेदनात वरील विषयांची चर्चा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.