प्रियांका चोप्राचा फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल

अभिनेत्री प्रियांका चोप्रानं बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. यामुळेच तिचे चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात पसंत केले जातात. प्रियांका चोप्रा सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. प्रियांकाने भारतातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव यावर चिंता व्यक्त करत लोकांना मदत मागत एक व्हिडीओ शेअर केला होता.

नुकताच प्रियांकाने सोशल मिडियावर तिचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे प्रियांका जोरदार ट्रोल केलं जात आहे. प्रियांकाने हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, मी आणि निक आता मॅक्स फॅक्टर ब्रँडचे ग्लोबल एंबेस्डर बनलो आहोत. हे सांगत प्रियांकाने व्हाइट ड्रेसमधील एक फोटो शेअर केला. हा फोटो तिच्या चाहत्यांना आवडला आहे. मात्र, हा फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केला जात आहे.

एका यूजरने प्रियांकाच्या फोटोवर कमेंट करत म्हटंले आहे की, लोक मरत आहेत आणि आपल्याला फोटो क्लिक करण्यात मजा येत आहे. मला तुमच्याकडून खरोखरच ही अपेक्षा नव्हती. प्रियंका चोप्रा आणि निक जोनस स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून भारतातील लोकांना मदत करत आहेत. भारताला कशी मदत करता येईल हे त्यांनी लोकांना सांगितले. याबाबत प्रियंकाने सांगितले की, ‘मी आणि निकने आमच्या वतीने योगदान दिले आहे. प्रत्येकजण सुरक्षित होईपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. मदतीसाठी अनेक लोक पुढे येत आहेत हे पाहून बरे वाटले.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झालेतर, प्रियांका चोप्राला शेवटी ‘द व्हाइट टायगर’ चित्रपटात राजकुमार राव आणि आदर्श गौरवसोबत दिसली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटामध्ये प्रियांकाच्या चित्रपटाचे नामांकन झाले होते. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला. आता प्रियांका लवकरच अ‍ॅमेझॉन प्राइमची वेब सिरीज सिटाडेलमध्ये दिसणार आहे. या वेब सिरीजमझ्ये प्रियांका स्पाय थ्रिलर अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.