पहिलीचा विद्यार्थी सोडवतोय पाचवीची गणितं, इंडिया बुक ऑफ रिकॉर्डमध्येही नोंद
बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील केसकरा ब्लॉक अंतर्गत तित्रा बिशनपूर येथील रहिवासी आणि अमृता कुमारी आणि मनु कुमार यांचा 6 वर्षांचा मुलगा अथर्वमनु याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. अथर्व मनूने 1 मिनिट 22 सेकंदात एक ते शंभर चा वर्ग बोलून विश्वविक्रम केला आहे.आता अथर्वने 2 मिनिटे 45 सेकंदात एक वरून शंभरचा क्यूब बोलून विश्वविक्रमाच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. त्यासाठी तो सतत तयारी करत असतो. अथर्व फक्त 6 वर्ष 1 महिन्याचा आहे. गणितासोबतच तो सामान्य ज्ञानातही हुशार आहे.अथर्वला जगातील 10 मोठे देश, 5 छोटे देश, लोकसंख्येनुसार 5 मोठे देश, 5 छोटे देश, 5 जीडीपीनुसार 5 श्रीमंत देश, 5 गरीब देश, जगातील मोठे पर्वत, क्षेत्रफळानुसार सर्वोच्च पर्वत शिखर, पाच लांबी नदी किती मोठी आहे आणि तिची लांबी, सूर्यापासून आठ ग्रह किती किलोमीटर आहेत, तसेच ती पृथ्वीभोवती किती दिवसांत फिरते.इतकेच नव्हे तर सुमारे 150 देशांची राजधानी लक्षात ठेवण्यासोबतच, नकाशावरील कोणता देश कुठे आहे, हे सर्व माहिती आहे. जगातील 5 सर्वात मोठे वाळवंट, भारतातील सर्व राज्यांच्या राजधान्या आणि GK ची इतर अनेक तथ्ये त्याला पहिल्या इयत्तेत असूनही माहिती आहेत.
‘महाविकासआघाडी’च्या बैठकीत काय झालं?
महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पार पडली. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते, तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी हजेरी लावली. काँग्रेसकडून नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान, भाई जगताप आले होते. या बैठकीमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत महाविकासआघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.’कर्नाटकमध्ये भाजपचा प्रचंड पराभव झाला, निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत साधक बाधक चर्चा झाली. महाविकासआघाडी एकसंध काम करणार आहे. उन्हाळ्यामुळे सभा स्थगित करण्यात आल्या आहेत. पुढे पावसाळा आहे, त्यामुळे इनडोअर सभा घेण्यात येणार आहेत. निवडणुकीबाबत हळूहळू चर्चा सुरू करणार आहे,’ असं जयंत पाटील म्हणाले.
ठाकरे गटाला आमचाच व्हीप लागू होणार; शिंदे गटाचा मोठा दावा
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षावर महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने 11 मे ला दिला. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंचा राजीनामा, राज्यपालाचा निर्णय आणि आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरही निकाल दिला. यावेळी 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांनी घ्यायचा असल्याचंही निर्णयात म्हटलं आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे आपला प्रतोद निवडतील आणि ठाकरे गटातील आमदारांना हा व्हीप लागू होईल ठाकरे गट अडचणीत येईल आमचाच व्हीप लागू होईल. असा दावा खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
‘घरात बसून स्वप्न बघितल्यावर…’, कर्नाटकच्या निकालावरून भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा दारूण पराभव केला, यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा पराभव भाजपच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा आहे. विरोधी पक्ष हा जिंकत नसतो तर सत्ताधारी हरत असतात, आपलं कोण वाकडं करू शकतो? अशा विचाराचा जो असतो, त्याचा हा पराभव आहे. जनतेला कधीही गृहित धरू नये, हा बोध या निकालातून सगळ्यांनी घ्यावा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.’विरोधी पक्ष का कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात. हा पराभव स्वभावाचा पराभव आहे, वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकडं करू शकतं, असा जो विचार असतो त्याचा हा पराभव आहे. जनतेला, लोकांना कधीही गृहित धरू नये, हा बोध या निकालातून सगळ्यांनी घ्यावा,’ असा टोला राज ठाकरेंनी लगावला. राज ठाकरेंच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
कर्नाटकच्या सत्तास्थापनेसाठीही महाराष्ट्राचे शिंदे ठरणार गेम चेंजर, स्पेशल विमानाने बंगळुरूला रवाना
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळालं आहे. काँग्रेसला 136 जागांवर विजय मिळाला आहे. तर, भाजप 65 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निकालानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेणं काँग्रेस हायकमांडसाठी निश्चितच आव्हानात्मक असणार आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा सदस्यांच्या बैठकीसाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी पाठवलेल्या स्पेशल विमानातून सुशीलकुमार शिंदे तातडीने बेंगलोरला रवाना झाले आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती
कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण विभाग येथे संचालकपदी नियुक्ती झाली आहे. पुढील दोन वर्षांसाठी ते सीबीआयचे संचालक असणार आहेत. या पदाच्या नियुक्तीसाठी उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचा समावेश होता.
‘मोचा चक्रीवादळ’ २०० किमी प्रति तास वेगाने बांगलादेश-म्यानमारच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकलं
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मोचा चक्रीवादळ तयार झालं आहे. या चक्रीवादळाने आता उग्र रूप धारण केलं असून ते २०० किमी प्रति तास वेगाने बांगलादेश-म्यानमारच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकलं आहे. त्यामुळे बांगलादेश-म्यानमारच्या सीमावर्ती भागात मुळधार पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांनी किनारपट्टीजवळ जाऊ नये, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
‘तू-तू मैं-मैं’ मालिका पुन्हा नव्याने येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘तू-तू मैं-मैं’ ही मालिका छोट्या पडद्यावर आली आणि तुफान लोकप्रिय झाली. ही मालिका संपून अनेक वर्षं होऊन गेली असली तरीही आज प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. सासू-सुनेमधील कुरबुरी या मालिकेमध्ये दाखवल्या गेल्या होत्या. तर आता ही मालिका नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.‘तू-तू मैं-मैं’ या मालिकेमध्ये सुप्रिया पिळगावकर सुनेच्या भूमिकेमध्ये होत्या तर अभिनेत्री रीमा लागू यांनी या मालिकेत सासूची भूमिका साकारली होती. ९०च्या दशकांत ही मालिका खूप गाजली. २६ जुलै १९९४ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला. पहिल्या भागापासूनच या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत गेलं. आता याचा दुसरा भाग लवकरच सुरू होणार आहे.‘तू-तू मैं-मैं’ या मालिकेचं दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी या मालिकेच्या दुसऱ्या भागाबद्दल मोठा खुलासा केला. ते म्हणाले, “या मालिकेला नव्याने प्रेक्षकांसमोर आणण्याची मी तयारी करत आहे. या मालिकेच्या पहिल्या भागात सुप्रिया सुनेची भूमिका साकारत होती, तर आता या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये ती सासूच्या भूमिकेत दिसेल.”
किरॉन पोलार्डला मागे टाकत विराट कोहलीने रचला विक्रम
आयपीएल २०२३ च्या ६० व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना राजस्थान रॉयल्सशी झाला. या सामन्यात बंगळुरूने राजस्थानचा ११२ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १७१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ ५९ धावांत गारद झाला. दरम्यान विराट कोहलीने एक विक्रम रचला आहे.विराट कोहलीने बॅटने काही कमाल केली नाही. पण राजस्थानविरुद्ध क्षेत्ररक्षणात उतरल्यावर त्याने एक मोठा विक्रम केला. विराटने मोहम्मद सिराजच्या पहिल्याच षटकात राजस्थानचा स्टार सलामीवीर यशस्वी जैस्वालचा झेल घेत किरॉन पोलार्डला मागे टाकले. आता तो नॉन-विकेटकीपर म्हणून आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. मिस्टर आयपीएल सुरेश रैना या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याचवेळी, आयपीएलमध्ये केवळ ३ विकेटकीपर नसलेले असे खेळाडू आहेत, ज्यांनी १०० हून अधिक झेल घेतले आहेत.
SD Social Media
9850 60 3590