देशात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचल्याने आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा जाणवत असताना केंद्रीय विज्ञान मंत्रालयाचा एक निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. केंद्रीय विज्ञान मंत्रालयाने गायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो का, यावर संशोधन करण्यासाठी ह्रषिकेश येथील एम्स रुग्णालयाला तीन लाखांचा निधी दिला आहे.
एम्स रुग्णालयात करण्यात येणाऱ्या या संशोधनासाठी कोरोनाची सामान्य लक्षणे असलेल्या 20 जणांची निवड केली जाणार आहे. यापैकी एका गटाला नेहमीच वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत. तर दुसऱ्या गटाला नेहमीच्या उपचारांसोबत आयुर्वेदिक औषधे, गायत्री मंत्राचे पठण आणि योगासने करायला सांगितली जातील. त्यानंतर दोन्ही गटाच्या रुग्णांवर काय परिणाम झाले आहेत, हे तपासले जाईल.
‘देशात लोक मरताय, पण परदेशातून येणारी वैद्यकीय साधनसामुग्री विमानतळांवरच धूळ खात पडलेय’ या संशोधनासाठी एम्स रुग्णालयाला तीन लाखांचा निधी देण्यात आला आहे. रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स तैनात असतील. साधारण दोन ते तीन महिने हे संशोधन चालेल. या काळात रुग्णांना नेहमीच्या औषधांसोबत पतंजलीचे कोरोनील हे आयुर्वेदिक औषधही देण्यात येईल. या उपचारांनी कोरोना रुग्णांना काही मदत होते का, हे तपासले जाईल, अशी माहिती डॉ. रुची दुआ यांनी दिली.
देशात कोरोनाचा पुन्हा विस्फोट, चार लाखांहून अधिक नवे रुग्ण, एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळी
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट (Corona Cases in India) होताना पाहायला मिळाला आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 980 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले असून एका दिवसात सर्वात जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे.