पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशाताील वाराणासीच्या काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने देश-विदेशातील पाहुणे काशीत येमार असल्याने देवालये, कुंड, गंगा घाट आदीची साफसफाईही करण्यात आली आहे. तसेच या परिसरात विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे, त्यामुळे काशी शहर उजळून निघालं आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर काशीतील प्रत्येक घरात प्रसाद आणि एक पुस्तक दिलं जाणार आहे. एवढी जय्यत तयारी योगी प्रशासनाने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. अधिकृत माहितीनुसार नरेंद्र मोदी 11 वाजता विशेष विमानानं बाबतपूर विमानतळावर पोहोचतील.
वाराणसी हा खुद्द पंतप्रधानांचाही लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे ते दोन दिवस होमग्राऊंडवर असतील. 13 आणि 14 डिसेंबर मोदी वाराणसीत असतील. दोन दिवसांचा हा दौरा 30 तासांचा असेल. आज सकाळी 10 वाजता मोदी काशीत पोहोचतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि इतर प्रतिनिधी त्यांचं एअरपोर्टवर स्वागत करतील. पंतप्रधान मोदी हे एअरपोर्टहून संपूर्णानंद मैदानापर्यंत हेलिकॉप्टरनं जातील. त्यानंतर ते बाबा कालभैरवांच्या दर्शनासाठी रवाना होतील. त्या दर्शनसोहळ्यानंतर मोदी हे खिडकिया घाटावर जातील. त्यानंतर मात्र मोदी दुपारी दीड वाजता क्रुजमधून काशी विश्वनाथ कॉरीडॉरमध्ये प्रवेश करतील.
उद्या म्हणजेच 14 डिसेंबरला सकाळी साडे नऊ वाजता काशी वाराणसी महानगर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत मोदी बैठक करतील. ही बैठक अर्धा तास चालेल. सकाळी दहा वाजता भाजपच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरु होईल. भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं हे संमेलन चार तास चालण्याची शक्यता आहे. यात गुजरात, गोवा, हरयाणा, कर्नाटक, आसाम, अरुणाचलप्रदेश, मध्यप्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंडचे मुख्यमंत्री स्वत:च्या राज्यातल्या विकास कामांवर प्रजेंटेशन देतील. दुपारी 2.30 वाजता मोदी मुख्यमंत्र्यांची बैठक आटोपून तीन वाजता स्वर्वैद मंदिरात जातील. तिथं मोदींचा अडीच तासाचा कार्यक्रम निर्धारीत आहे. इथं ते अनुयायी, भक्तांना संबोधीत करतील. स्वर्वेद मंदिराचा हा 98 वा वार्षिकोत्सव आहे. तिथून मोदी सायंकाळी साडे चार वाजता दिल्लीसाठी रवाना होतील.