2024 मध्ये मोदींना कोण देणार टक्कर?

राहुल-पवार-ममतांनंतर आता नितीश कुमारांची एण्ट्री

नितीशकुमार यांनी बाजू बदलताच नरेंद्र मोदींच्या तुलनेत 2024 मध्ये विरोधकांचा चेहरा कोण असेल, असा प्रश्न विचारला जात आहे. भाजपच्या विजयरथाला कोण आव्हान देणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रभावशाली व्यक्तीमत्वाला टक्कर देण्यासाठी कोण पुढे येईल? असे प्रश्न उपस्थित होत आहे. मोदींना आव्हान देणारा सक्षम नेता नसल्यामुळे गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत त्यांचा मार्ग सुकर झाला होता. 2024 मध्ये त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार की कोणी आव्हान उभं करणार, हा मोठा प्रश्न आहे.

नितीश कुमार यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यानंतर 2024 मध्ये विरोधक कोणाच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा चेहरा राहुल गांधी असेल की नितीशकुमार? किंवा ममता बॅनर्जी, शरद पवार यांसारखे दुसरे विरोधी पक्षनेते पुढे केले जातील. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्याचा युक्तिवाद करत पंतप्रधानपदावर आपला दावा सांगत आहे. मात्र, नितीशकुमार यांनी पक्ष बदलल्याने विरोधकांचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या अनुभवाचे कौतुक करून प्रकरण अधिक गुंतागुंतीचे केले आहे.

काँग्रेस या प्रकरणात सावध पाऊलं टाकत आहे. काही नेते उघडपणे राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणत असले तरी ते सध्यातरी प्रभावी नेते नाहीत. या विषयावर बडे नेते सावधपणे बोलत आहेत. यामागे ‘राहुल गांधीं’चा जप केल्याने विरोधी पक्ष नाराज होऊ नयेत आणि संभाव्य निवडणूकपूर्वी युती तुटण्याची भीती आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर निर्णय होणार असल्याचे बडे नेते बोलत आहेत, तर काही नेत्यांनी वेळ आल्यावर पाहू, असे सांगत यावर तूर्तास पडदा टाकला आहे.

2024 मध्ये नरेंद्र मोदींना विरोधकांकडून कोण आव्हान देणार?

काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी आणि तारिक अन्वर हे राहुल गांधींना पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी योग्य मानत आहेत, तर राजीव शुक्ला आणि अधीर रंजन सारखे नेते वेळेवर निर्णय घेण्याचा सल्ला देत आहे.

साहजिकच काँग्रेसला 2024 मध्ये नरेंद्र मोदींना तगडे आव्हान द्यायचे आहे, त्यामुळे नेतृत्वाबाबत आडमुठेपणाचे कोणतेही संकेत देऊ इच्छित नाहीत. आधी सर्वांना एकत्र आणून निवडणूक लढवायची आणि बहुमत मिळाल्यावर किंवा जवळ आल्यावर सर्वात मोठा पक्ष असल्याचा युक्तिवाद करून पंतप्रधानपदावर आपला दावा ठोकायचा, अशी पक्षाची रणनीती आहे. सध्या काँग्रेसचे संपूर्ण लक्ष प्रबळ विरोधी पक्ष उभे करण्यावर आहे, त्यामुळे नितीशकुमार यांच्यासारख्या अनुभवी आणि ओबीसी नेत्याला नाकारण्याऐवजी त्यांचाही या शर्यतीत विचार होत आहे. त्यानंतर 2024 पर्यंत आकड्यांनुसार हक्क सांगायचे आणि त्याआधी काळजीपूर्वक बोलायचे, अशी रणनीती काँग्रेस अवलंबणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.